शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच ग्रामपंचायतींना मुहूर्तच मिळेना

By admin | Updated: May 24, 2017 02:13 IST

प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली.

मजुरांना कामाची प्रतीक्षा : तहसीलदारांच्या पत्राला केराची टोपली भोजराज गोवर्धन। लोकमत न्यूज नेटवर्क मूल : प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. मात्र तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीने अजुनही कामाला सुरुवात केली नसल्यामुळे मजुरांना कामासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. सदर योजनेचे कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश तहसीलदार मूल यांनी ग्रामपंचायतींना दिले. मात्र त्या आदेशाला ग्राम पंचायतीने केराची टोपली दाखवली आहे. शासनाने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. गावखेड्यातील प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, मजुरांचे इतरत्र स्थलांतर होवू नये यासाठी सदर योजना गावागावात राबविल्या जाते. परंतु, आजच्या स्थितीत अजूनही आकापूर, चितेगाव, हळदी, सितळा आणि टोलेवाही या ग्राम पंचायतीने कामाला सुरुवात केलेली नाही. सदर योजनेतंर्गत कामे सुरू करण्याबाबत तहसीलदार मूल यांनी २० मे रोजी येथील गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना पत्र पाठवून आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ कामे सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु, सदर पत्राला ग्राम पंचायतीने केराची टोपली दाखविलेली आहे. २२ मेपर्यंत तालुक्यातील आकापूर, चितेगाव, हळदी सिंतळा आणि टोलेवाही या ग्राम पंचायतने कामाला सुरुवात केलेली नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मूल तालुक्यात १९९.५५ टक्के कामे करण्यात आलेले आहेत. त्यापैकी मूल पंचायत समितीने १७३.९८ टक्के कामे केलेले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तालुका कार्यक्रम समन्वयक तथा तहसीलदार मूल यांनी तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना २० मे रोजी पत्र पाठवून सदर योजनेअंर्गत आपल्या अधिनस्त असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये किमान एक काम सुरू करावे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामाची मागणी होत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ कामे सुरू करून त्यावर मजुर उपस्थिती राहील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले, सदर कामे दोन दिवसांत सुरू करून ग्रामपंचायत निहाय अहवाल कार्यालयात सादर करावे, असे आदेश दिलेले आहेत. परंतु, अजुनही अनेक ग्रामपंचायतीने कामाला सुरुवातच केलेली नाही. यामुळे तहसीलदाराच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे बोलले जात आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे प्रत्येक गावात सुरू आहे. ज्या ग्रामपंचायतीने कामाला सुरुवात केलेली नाही त्या ग्राम पंचायतीची चौकशी करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश देवू अशी प्रतिक्रिया मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.