दुर्गापूर परिसरात गत अनेक वर्षापासून विषाक्त ताडी विकण्याचा सर्रास अवैध व्यवसाय सुरू आहे. यात आहारी गेलेल्या दुर्गापूर परिसरातील काही युवकांचा यापूर्वी बळी गेला आहे. याचा आधार घेत मृत युवकांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रात्री अवैध ताडी विक्रेत्याच्या घरावर हल्ला केला. दुर्गापूर पोलिसांनी हल्लेखोरांना हुडकून पवन इंगळे (२२), सोनू दहीवडे (२५), रा. दुर्गापूर, प्रदीप रासेकर रा. घुटकाळा वाॅर्ड चंद्रपूूर व दुर्गापूर येथील दोन युवतींना अटक केली. त्यांच्याकडून नगदी १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. अन्य काही हल्लेखोर फरार आहेत. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर सहारे करीत आहेत.
बॉक्स
अवैध ताडी व्यवसाय बंद करावा
दुर्गापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व बनावट अशी विषाक्त ताडी विक्री सुरू आहे.या अवैध व्यवसायामुळे येथील कायदा व सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे. परिणामी येथे गुन्हेगारी बळावून गंभीर गुन्हे घडत आहेत. या अवैध व्यवसायाकडे पोलिसांनी लक्ष देऊन ते बंद करावे, अशी मागणी आहे.