शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयावर पहिल्यांदाच महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वैशाली शेरकी व स्मिता पारधी तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. सतीश वारजूकर व खोजराज मरस्कोल्हे यांनी नामांकन दाखल केले.

ठळक मुद्देभाजपने गड राखला । अध्यक्ष संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर भाजपने स्वबळावर कमळ फुलवत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखण्यात भाजप नेते माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निर्विवाद यश आले. अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात दोन्ही पदांवर महिला विराजमान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. काँग्रेसने अखेरपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. मात्र, भाजपने हा प्रयत्न हाणून पाडला.जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वैशाली शेरकी व स्मिता पारधी तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. सतीश वारजूकर व खोजराज मरस्कोल्हे यांनी नामांकन दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मूलचे उाविभागीय अधिकारी महादेव खेडकार यांनी नामांकन अर्जांची छानणी झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. यानंतर उमेदवाराच्या समर्थनात हात उंचावून मतदान करण्याचे जाहीर करण्यात आले.मात्र, निवडणुकीच्या दहा मिनिटाअगोदर काँग्रेसचे सदस्य डॉ. सतीश वारजूकर व स्मिता पारधी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या संध्या गुरनुले यांना ३६ तर काँग्रेसच्या वैशाली शेरकी यांना २० मते तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार रेखा कारेकार यांना ३६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे खोजराज मरस्कोल्हे यांना २० मते मिळाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांनी अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार यांची निवड झाल्याची घोषणा केली. निकाल जाहीर होताच भाजपच्या समर्थकांनी जि.प.च्या परिसरात जल्लोष केला.भाजपच्या शिस्तबद्ध प्रयत्नांचे फलितआरक्षण जाहीर झाल्यापासूनच भाजपने आपल्या ३६ सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न केले होते. काही नाराज सदस्य विरोधकांच्या गळाला लागू नये, याकरिता अखेरपर्यंत खबरदारी घेतली. शिवाय, सर्व सदस्यांची कुटुंबासह हैदराबाद पर्यटनवारीही घडवून आणली. परिणामी, भाजपला जिल्हा परिषदेचा गड कायम राखता आला.विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीभाजपचे पक्षश्रेष्ठी व सर्व सदस्यांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न करेन. भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांच्यासह सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामांना प्राधान्य देईन. ग्रामीण भागात रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व पाणी या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणार आहे.- संध्या गुरूनुले, अध्यक्ष जि. प.विकास हेच ध्येयजि. प. च्या उपाध्यक्षपदाची मला पहिल्यांदाच संधी मिळाली. याकरिता भाजपचे पक्षश्रेष्ठी व सर्व सदस्यांचे मी आभार मानते. अडीच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार आहे. विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.- रेखा कारेकार, उपाध्यक्ष जि. प.महिला शक्तीचा मी सन्मानच करतो. मात्र, जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोनही पदांवर महिलांना संधी देण्यात आली. भाजपने अनुभवी सदस्यांना डावलले. त्यामुळे यापुढे जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे.- डॉ. सतीश वारजूकर,गटनेता काँग्रेस.जनतेला उत्तम सेवा देतील - सुधीर मुनगंटीवारजिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला. याआधी देवराव भोंगळे व कृष्णा सहारे तसेच सर्व सदस्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आता संध्या गुरनुले व रेखा कारेकार यांच्या रूपाने महिलाराज आले आहे. हे महिलाराज अडीच वर्षात सर्वोत्तम सेवा जनतेला देतील. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात काँग्रेस-राकाँ-शिवसेना महाविकास आघाडीला झटका बसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही १५ पैकी ८ पंचायत समित्यांवर सभापती व उपसभापती तर दोन पंचायत समित्यांवर भाजपाचे दोन उपसभापती विजयी झालेत. चंद्रपूर महानगर पालिकेतही भाजपने विजय मिळवला. आता जिल्हा परिषदेवर भाजपने विकासाचे कमळ फुलवले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक