शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आधी डोळे स्कॅन होणार, मगच रेशन मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:23 IST

Chandrapur : रेशन दुकानात ठसे जुळत नसलेल्यांसाठी नवा पर्याय शिधापत्रिकाधारकांना मिळणार ही सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेशन दुकानात ई-पॉस मशीनमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत म्हणून अनेक वेळा धान्याविना परतण्याची वेळ लाभार्थ्यांवर येते. विशेष करून वयोवृद्धांचे ठसे जुळतच नाही. आता मात्र धान्याविना परतण्याची वेळ कोणालाच येणार नाही. यासाठी आधारबेस फोर जी ई- पॉस मशीन प्रत्येक रेशन दुकानात लागणार आहे. यामध्ये आय स्कॅनरची सुविधा उपलब्ध राहणार असून, फोर जीची स्पीडसुद्धा राहणार आहे. त्यामुळे रेशनसाठी ताटकळत राहण्याची समस्या आता दूर होणार आहे.

यापूर्वी टू जी ई-पॉसमुळे रेशन दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे या मशीन बदलण्यात येऊन नव्याने चांगल्या गतीच्या मशीन व आय स्कॅनरची सुविधा देण्याची मागणी रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांकडूनही केली जात होती. त्यानंतर आता शासनाने या रेशन दुकानांमध्ये फोन जी ई-पॉस मशीन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काही दिवसांमध्ये प्रत्येक दुकानात फोर जी ई-पॉस मशीन दिसणार आहे.

धान्य वितरण प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासोबतच गतिमानता वाढण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांचाही वेळ वाचणार आहे.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार ही सुविधा फोर जी ई-पॉस मशीनद्वारे आधारबेस ऑनलाइन प्रणाली तयार झाली आहे. यात दैनिक विक्री, मासिक विक्री, 'वन नेशन-वन रेशन' अंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारक उपलब्ध आहेत. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीमध्ये येणाऱ्या अडचणीही फोर जी ई-पॉस प्रणालीमध्ये दूर होणार आहेत. याद्वारे कुठलाही रेशनधारक कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकणार आहे. अन्य सुविधांचा लाभ रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.

१५३४ रेशन दुकानात लागणार फोर जी ई-पॉस मशीनजिल्ह्यातील १ हजार ५३४ रेशन दुकानामंध्ये या मशीन लागणार आहेत. यासाठी पुरवठा विभागाने नियोजन सुरू केले आहे. यामध्ये बल्लारपूर ६६, भद्रावती १०२, चंद्रपूर ७९, ब्रह्मपुरी १२१, चंद्रपूर शहर ९७, चिमूर १४१, गोंडपिपरी ८६, जिवती ८९, कोरपना ९७, मूल ६७, नागभीड ११८, पोंभूर्णा ५५, राजुरा १०८, सावली ८५, सिंदेवाही ९५, वरोरा १३० रेशन दुकानांचा समावेश आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर