शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आधी पगार द्या; नंतरच मशिनरीज हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:21 IST

कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला.

ठळक मुद्देकुनाडाचे कामगार संतप्त : धनसार कंपनीचा प्रयत्न हाणून पाडला

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला. आधी वेतन द्या, नंतरच मशिनरीज हलवा, असा भूमिका घत कामगारांनी कुनाडा खाण परिसरात ठिय्या दिला. हा प्रकार गुरुवारी घडला.जिल्ह्याचे कामगार आघाडीचे नेते उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. संतप्त कामगारांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता कंपनीच्या अधिकाºयांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी समस्या निवारण्यासाठी मध्यस्थी केली. परंतु झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. कोणत्याही परिस्थितीत वेतन मिळाल्याशिवाय मशिनरीज इतरत्र हलवू देणार नाही, असा पवित्रा कामगारांनी कायम ठेवल्याने खाण परिसरात तनावपूर्ण स्थिती आहे. कामगारांनी समस्या सोडविण्यासाठी उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात बैठक घेतली. बैठकीत धनसार कंपनीचे अधिकारी चंद्रमा सिंग, व्यवस्थापक अनुप पोटे, वेकोलिचे आरमुगम आदी उपस्थित होते. कामगारांचे वेतन तत्काळ देवून या प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यावर धनसार कंपनीने निर्णय घेतलेला नाही.