शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चंद्रपूर जिल्ह्यातील बॉटनिकल गार्डनमध्ये साकारतेय राज्यातील पहिले थ्रीडी प्लॅनेटोरियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:04 IST

१६ जून २०१५ च्या महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्हयातील विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा निर्णय झाला आहे.

ठळक मुद्दे१४ कोटी २१ लाख ६३ हजार रूपये निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक निमार्णाधीन असलेल्या देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डनमध्ये राज्यातील पहिल्या थ्रीडी प्लॅनेटोरीयम अर्थात तारांगणाच्या निमीर्तीसाठी १४ कोटी २१ लक्ष ६३ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून ११ सप्टेंबर २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.१६ जून २०१५ च्या महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्हयातील विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा निर्णय झाला आहे. सदर प्रकल्पाची योजना राबविण्याकरिता राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनौर या संस्थेची प्रकल्पाच्या तांत्रिक कामात मदत घेतली जात आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण हे संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बीज संग्रहालय, बोन्साय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया गार्डन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील आदिवासी व गरीब लोकांना जगण्याचे साधन निर्माण होणार आहे. तसेच वनविभागामार्फत रोपवन कामे, निरीक्षण पथ, जल व मृद संधारणाची कामे, वॉट टावर पूल, रस्ते, जलाशय, सुशोभीकरण, सिमेंट नाला बांध, ट्री हाऊस इतर कामे प्रगतीपथावर आहेत. या बॉटनिकल गार्डनसाठी आतापर्यंत १७० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.देशातील अत्याधुनिक अशा या बॉटनिकल गार्डनच्या सौंदर्यात अधिक भर घातली जाणार आहे. ती या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्लॅनेटोरीयममुळे. डिजीटल इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या माध्यमातुन उभारण्यात येत असलेले हे प्लॅनेटोरीयम राज्यातील पहिले थ्रीडी प्लॅनेटोरीयम ठरणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने साकारात असलेले जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन व त्यात उभारण्यात येणाºया तारांगणामुळे चंद्रपूर जिल्हयाचे नाव आता जागतीक पातळीवर अधोरेखित होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान