शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरात इलेक्ट्रिक दुकानाला आग

By admin | Updated: March 12, 2017 01:18 IST

तालुक्यातील विसापूर येथील रेल्वे चौकाजवळील एका इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीला भीषण आग लागली.

कारण गुलदस्त्यात : लाखोंची उपकरणे भस्मसात बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील रेल्वे चौकाजवळील एका इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शुक्रवारी मध्यरात्रीला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे उपकरणे जळून भस्मसात झाली. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून दुकानदाराला लाखोंचा फटका बसला आहे. नागरिकांच्या सर्तकतेने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. विसापूर येथील रेल्वे चौकालगत एका धार्मिकस्थळाला लागून तीन-चार दुकानाची चाळ आहे. या चाळीतील इम्रान मोहम्मद यांचे फ्रेंडस इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचे दुकान आहे. या दुकानाला शुक्रवारच्या मध्यरात्री अचानक आग लागली. या रस्त्याने जाणे-येणे करणाऱ्या नागरिकांना दुकानातून धूर निघत असल्याचेलक्षात आले. त्यांनी दुकान मालकाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला कवेत घेतले होते. मध्यरात्र असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. मात्र परिसरातील नागरिकांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर पाण्याचा शिडकाव करून नियंत्रण मिळविले. त्यामुळे लगतच्या इतर दुकानाला आगीपासून वाचविण्यात यश आले. परिणामी येथील रेल्वे चौकात मोठा अनर्थ टळला. या आगीत इम्रान मोहम्मद यांच्या दुकानातील किंमती साहित्य जळून भस्मसात झाले आहे. त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यादुकानमालकाने बेरोजगारीवर मात करण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाच वर्षापूर्वी दुकान सुरू केले होते. अचानक लागलेल्या आगीने व त्यात भस्मसात झालेल्या उपकरणामुळे त्याचेवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)