शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

वीज वितरण कंपनीच्या स्टोअर परिसरात आग

By admin | Updated: June 3, 2014 02:31 IST

नागपूर- चंद्रपूर मार्गालगतच्या बोर्डा चौक नजीक असलेल्या वीज

वरोर्‍यातील

वरोरा

घटना : मोठी हानी टळली : नागपूर- चंद्रपूर मार्गालगतच्या बोर्डा चौक नजीक असलेल्या वीज वितरण कंपनीच्या स्टोअरला परिसरात काल रविवारी आग लागली. आग परिसरात पसरत होती. उपस्थित कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यातच तात्काळ अग्निशमन दल पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले नसते तर लाखो रुपयांची सामुग्री जळून खाक झाली असती.

वीज

वितरण कंपनीच्या स्टोअर परिसरात मोठय़ा प्रमाणात वाळलेले गवत आहे. याच परिसरात सबस्टेशन असल्याने या भागातून वरोरा शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यात येत असल्याने विद्युत तारांचे जाळे विणल्या गेले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात गवत जवळ असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील वीज पुरवठा तत्काळ खंडीत करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जीएमआरएमको, वर्धा पॉवर, वरोरा नगर परिषदचे अग्निशामक दल तातडीने पोहचले. त्यामुळे आग आटोक्यात आली. स्टोअरमध्ये मोठय़ा प्रमाणात ऑईल ड्रम, ट्रान्सफॉर्मर व इतर लाखो रुपयांचे साहित्य होते. आग पसरत गेली असती तर लाखो रुपयांचे साहित्य आगीत सापडले असते. आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मागील वर्षर्ीे याच परिसरात उन्हाळ्यामध्ये आग लागली होती, हे विशेष. या परिसरात वारंवार आग लागत असल्याने यावर उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे. सचिव गेडाम, सचिन पोले, आशीष श्रीवास्तव यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.(तालुका प्रतिनिधी)