हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे
नागभीड : तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून, विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे बंद हातपंप दुरुस्तीसाठी पथक पाठविणे अत्यावश्यक झाले आहे.
एटीएममध्ये आर्थिक कोंडी
चंद्रपूर : शहरातील बऱ्याच बँकांच्या एटीएममध्ये पैसे राहत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन एटीएममध्ये पूर्णवेळ पैसे ठेवण्याची सोय करण्याची मागणी केली जात आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे सुशिक्षित बेरोजगार त्रस्त आहेत. नोकरी मिळेल की नाही, याची चिंता आहे. रिक्त जागांबाबत निर्णय घेऊन पदभरती करावी, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे.