शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ माजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते.  काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सत्तेचा मोह भल्या-भल्यांना आवरत नाही. सत्तेच्या अनुषंगाने येणारे फायदे हेच त्यामागचे मूळ कारण. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल फेब्रुवारीत संपूनही शासकीय बंगल्यांचा वापर सुरूच असल्याचे लक्षात येताच शनिवारी प्रशासनाने कुलूप ठोकले. परिणामी, ‘त्या’ माजी पदाधिकाऱ्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.चंद्रपुरातील सिव्हील लाईन मार्गावर जि. प. पदाधिकाऱ्यांसाठी शासकीय बंगले तयार करण्यात आले. या बंगल्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जि. प. कडे आहे. बंगल्यांची देखभाल दुरूस्ती वीजबिल यासह अन्य बाबींवर दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे बंगले पक्त पाच वर्षांसाठी अधिग्रहित केले होते. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बंगले खाली करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार काहींनी लगेच खाली केले तर काहींनी मात्र बंगल्यांचा अनधिकृत वापर सुरूच ठेवला होता.

अन् केला  वीजपुरवठा खंडितउन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्ताने जिल्हास्थळी येणारे माजी जि. प. पदाधिकारी व त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते या बंगल्यांवर ठिय्या मांडायचे. एसीचाही सर्रास वापर केला जायचा. त्यामुळे वीज बिल वाढले. मुदत संपूनही काही पदाधिकारी बंगले खाली करण्याच्या मानसिकतेत दिसून येत नसल्याचे पाहून आता जिल्हा परिषदेनेच   त्या बंगल्यांना कुलूप लावले व वीजपुरवठा खंडित केला.

२० फेबु्वारीलाच संपला होता कार्यकाळ जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा काळ २० फेबु्वारी २०२२ रोजी संपला. जि. प. सध्या प्रशासकराज सुरू आहे. कालावधी संपून चार महिने होत असतानाही बंगले का रिकामे केले नाही, असा प्रश्न प्रशासकीय गोटांतूनच विचारला जात होता. दरम्यान, अनधिकृत वापर करून आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे लक्षात येताच जि. प. प्रशासनाने अखेर कार्यवाही केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद