शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अखेर जिल्हा प्रशासनाला मिळाले 79 कोटी 23 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 22:59 IST

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.     यासाठी तलाठी व  कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडली.  जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर केल्याने नुकसानभरपाईसाठी वरोरा तालुक्याचा ७९ कोटी २३ लाखांचा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.     यासाठी तलाठी व  कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते क्रमांक जमा केले नाही, त्यांनी तत्काळ आपले बँक खाते पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स प्रत संबंधित गावाचे तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, कोतवाल, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडे जमा करावे, अशा   सूचना महसूल प्रशासनाने दिल्या. 

ई-केवायसीचा अडथळाज्या शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाले तसेच ई-केवायसी केली नाही त्यांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते अद्ययावत करून घ्यावे. जेणेकरून, पीक नुकसानीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसल्याचे निदर्शनास आले. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल त्यांनी आजच ई-पीक पाहणी करून घ्यावी. जे शेतकरी ई-पीक पाहणी करणार नाही त्यांच्या सातबारावर पीडित पीक पाहणी दिसेल. परिणामी, त्यांना शासकीय अनुदान, पीक कर्ज आदींबाबत अडचणी निर्माण होतील.

शेतमाल विकताय; लाईव्ह फोटो अपलोड करा !चंद्रपूर : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी नोंदणी करताना सातबाराधारक शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे; परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याने धान व भरडधान्य खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले.

१५ ऑक्टाेबर अंतिम मुदत१५ ऑक्टोबर २०२२ ही पीक पाहणीची अंतिम मुदत असल्याने मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी तत्काळ करून घ्यावी. वरोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले अद्ययावत बँक खाते क्रमांक, संमतीपत्र तलाठीकडे जमा करावे. जेणेकरून विहित मुदतीत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास तालुका प्रशासनास सोयीचे होईल, असे आवाहन वरोरा तहसीलदारांनी केले     आहे.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना