शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नामांकनासाठी मिळाली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:50 IST

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमामध्ये एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक कार्यक्रमामध्ये एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याचे एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आले आहे.ब्रम्हपुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम यापूर्वी घोषित करण्यात आला होता. त्यात नामनिर्देशन पत्र वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असल्याचा कालावधी १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत व नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिदेर्शित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख २० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु नामनिर्देश पत्र व त्यासोबतचे शपथपत्र आॅनलाईन भरतेवेळी काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन व त्यासोबतचे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता आले नाही, असे काही निवडणूक निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांनी आयोगाला कळविले होते. उद्भवलेली परिस्थिती व भारतीय संविधान तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०-अ मधील तरतुदी लक्षात घेता मुदत संपणाºया ब्रम्हपुरी या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र वेबसाईटवर भरण्यात व दाखल करण्याचा कालावधी २० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत केला असून नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्शित झालेल्या उमेदवारांची यादी २१ नोव्हेंबरला प्रसिध्द करण्यात येईल. तसेच अपरिहार्य परिस्थितीत संबंधित नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र वेबसाईटवर भरून त्याची प्रिंट घेऊन सादर करणे शक्य नसल्यास ते आॅनलाईन पध्दतीने व पारंपरिक या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यास सुधारित कार्यक्रमानुसार आयोगाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, मतदानाचा दिनांक मतमोजणीचा दिनांक यात कोणताही बदल करण्यात आला नाही.