शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दीड हजार शेतकऱ्यांच्या कृषी पूरक व्यवसायाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:29 PM

आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी संघटीत झालेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर कृषीपूरक व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत प्रथमच स्थापन केलेल्या १० शेतकरी कंपन्यांनी यंत्र खरेदी केले असून विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘आत्मा’ने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला.

ठळक मुद्देकृषी यंत्रांची करणार खरेदी : वीज पुरवठ्यासाठी नियोजन समितीकडे पाठविला प्रस्ताव

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी संघटीत झालेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर कृषीपूरक व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत प्रथमच स्थापन केलेल्या १० शेतकरी कंपन्यांनी यंत्र खरेदी केले असून विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘आत्मा’ने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला. शेतकऱ्यांची नाराजी बघून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने निर्देश दिले होते. परिणामी यंत्रणा कामाला लागली असून रखडलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची आशा निर्माण झाली आहे.पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक शेती करता यावी शिवाय स्वत: उत्पादन केलेल्या शेतमालाचे मूल्यवर्धन व्हावी. उत्पादन, विक्री व विपणनाचे कौशल्य आत्मसात करुन आर्थिक बळकटी करण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत मूल, बेंबाळ, मारोडा, रामाळा व पेठगाव येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. शेतकरी गटांचे समुपदेशन केल्यानंतर कंपनी निर्मिती शक्य होऊ शकली. कंपणीतील सर्व सदस्य केवळ शेतकरी असून स्वत: शेती कसतात. उत्पादक केलेला माल व्यापाºयांच्या घशात घालण्याचे नाकारून हे शेतकरी सामंजस्याने एकत्र आलेत. स्वत:च्या शेतमालासोबत अन्य शेतकºयांच्या शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आणि मूल्यवर्धन अधिक नफा मिळवून देणे हा या शेतकरी कंपनीचा उद्देश आहे. आत्माअंतर्गत वरोरा, भद्रावती, चिमूर, मूल, कोरपना व सावली तालुक्यात १० शेतकरी कंपन्यांची स्थापना झाली. या कंपन्यादेखील कृषीपूरक व्यवयास उभारण्याच्या तयारीत आहेत. प्रकल्पासाठी शेतकºयांनी स्वत:चा २५ टक्के वाटाचा उचलला तर प्रकल्पाने ७५ टक्के अर्थसहाय केले. पाचही कंपन्यांचे शेतकरी लवकरच यंत्र बसविणार असून खरेदीची प्रक्रियाही पूर्ण केली.यंत्र बसविण्यासाठी इमारतही उभारली. मात्र वीज पुरवठा न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या या मुलभूत प्रश्नांकडे गांभीर्याकडे लक्ष देवून नुकतेच वीज पुरवठा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. परिणामी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व संबंधी अन्य यंत्रणानी तातडीने कार्यवाही पूर्ण केली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वीज जोडणीसाठी निधी मिळावा यासाठी वीज जोडणीचे प्रस्ताव नुकतेच सादर करण्यात आले. या प्रस्तावावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे. खरीप हंगामातील शेतमालावर स्वत:च्या गावातच प्रक्रिया, स्वच्छता, मूल्यवर्धन व प्रतवारी करून शेतकऱ्यांना जादा आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी या पाचही कंपन्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरु शकते.संघटन शक्तीची फलश्रुतीआर्थिक दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक योजना आहे. मात्र, अंमलबजावणीअभावी या योजना केवळ कागदावरच शोभून दिसतात. व्यक्तीगत योजनांचा लाभ घेताना संकटाचा सामना करावा लागतो, असा अनेक शेतकºयांचा अनुभव आहे. यातून सुटका करण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. हा विचार करुन मूल, बेंबाळ, मारोडा, रामाळा, पेठगाव येथील १ हजार ५४० शेतकरी एकत्र आले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन योजनांचा लाभ घेण्यास सज्ज झाले आहेत. याशिवाय टेमुर्डा, सालोरी, आष्टा, पाटाळा, खडसंगी, नेरी, मूल, उथळपेठ, गडचांदूर व सावली येथेही आत्माअंतर्गत १० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. या कंपन्यांचे सुमारे ७ हजार ५०० शेतकरी सभासद आहेत.हवे तांत्रिक मार्गदर्शनपाच शेतकरी कंपन्यांनी यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. येत्या काही दिवसांमध्ये हे यंत्र मूल, बेंबाळ, मारोडा, रसामाळा व पेठगाव येथे बसविण्यात येणार आहे. शेतकºयांना तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी पथक तयार करावे. सुसंवाद कायम ठेवून प्रकल्पाच्या प्रत्येक ठप्प्यावर मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी सांगितले.महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत पाच व आत्माअंतर्गत १० अशा एकूण १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली. प्रारंभी काही अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करुन शेतकºयांना सर्वदृष्टीने पाठबळ दिले. पायाभूत सुविधा निर्माण करताना पुढे आलेल्या अडथळ्यांवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे १० कंपन्यांच्या प्रकल्प निर्मितीचा मार्ग आता सुकर झाला आहे.- आर. जे. मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्माशेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलोत. प्रकल्प सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक ठप्प्यावर आमच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे. प्रकल्पात शेतमाल आणणाऱ्यां शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, गोदाम व एका वाहनाची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना कायम संकटात ठेवून कोणताही प्रकल्प यशस्वी होवू शकत नाही. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना नेहमी सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे.- प्रकाश खोब्रागडे, सितांगण शेतकरी उत्पादक कंपनी, मारोडा