शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

मतदारांच्या अर्जांची फाईल गहाळ

By admin | Updated: April 4, 2016 01:58 IST

एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. यासाठी

चंद्रपूर : एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. असे असताना शासकीय यंत्रणाच या उद्देशाला मूठमाती देत आहे. मतदारांनी मतदान कॉर्डासाठी दिलेल्या अर्जांची फाईलच गहाळ केली जात आहे. हा संतापजनक प्रकार येथील तहसील प्रशासनाकडून घडला आहे. शासकीय यंत्रणेच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.आपल्या लोकशाही देशात मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार प्रत्येकानेच बजावावा, यासाठी शासनही सर्व स्तरावरून प्रयत्न करीत आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी कोट्यवधींचा खर्च करून शासन अतिशय व्यापक स्वरुपात जनजागृती करीत आहे. एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे याच शासनाच्या यंत्रणेमुळे नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागत आहे. याची प्रचितीही नुकतीच आली. चंद्रपुरात एमईएमल प्रभागातील काही वॉर्डात काही वर्षांपूर्वी पूर आला होता. यात अनेकांची घरे वाहून गेली. नागरिकांचे मतदान कॉर्डही वाहून गेले. अशा नागरिकांसह काही नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत यावी, यासाठी एमईएल प्रभागातील नगरसेविका वनश्री गेडाम यांची भेट घेतली. वनश्री गेडाम यांनी परिसरातील ५० नागरिकांचे मतदान कॉर्डासाठी अर्ज तयार केले. सर्व अटींची पूर्तता करवून घेतली आणि हे ५० लोकांचे अर्जांची एक फाईल तयार करून मतदान कॉर्डासाठी ती फाईल तहसील प्रशासनाच्या सुपुर्द केली. वनश्री गेडाम यांनी ७ नोव्हेंबर २०१५ रोजी तहसीलदारांच्याच हाती ही फाईल सोपविली आणि मतदान कॉर्ड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. २३ जानेवारी २०१६ रोजी मतदान कॉर्डाचे वाटप होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र या दिवशी कॉर्डाचे वाटप झालेच नाही. पुढे फेब्रुवारी महिन्यात वनश्री गेडाम यांनी तहसील प्रशासनाकडे जाऊन चौकशी केली. मात्र यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने त्या परत आल्या. मार्च महिन्यामध्येही एक नव्हे तर दोनचारदा नागरिकांसह गेडाम यांनी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र कुणीही नागरिकांच्या अर्जाची फाईल कुठे आहे, हे सांगू शकले नाही. नागरिकांच्या वारंवार हेलपाट्या मारूनही काम होत नसल्याने अखेर नगरसेविका वनश्री गेडाम यांनी नायब तहसीलदार खांडरे यांची भेट घेतली. त्यांनी सर्व प्रकार खांडरे यांना सांगितला. खांडरे यांनी एका कारकुनाला सोबत घेऊन तहसीलदारांच्या केबीनमध्ये शोधाशोध केली. मात्र ५० नागरिकांच्या अर्जाची फाईल कुठेही सापडली नाही. एवढेच नव्हे तर प्रकरण प्रोसेसमध्ये असेल म्हणून त्यांनी तहसील कार्यालयातील लिपिक कन्नाके यांच्या माध्यमातून संगणकामध्येही नागरिकांची नावे तपासून बघितली. मात्र तिथेही काही आढळून आले नसल्याची माहिती वनश्री गेडाम यांनी लोकमतशी बोलताना दिली.याबाबत तहसीलदारांची बऱ्याचदा भेट घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी व गेडाम यांनी केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. अखेर गेडाम यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना याबाबत विचारणा केली. मात्र तेदेखील समाधान करू शकले नाही. मतदार यादीत नाव यावे, मतदान कॉर्ड मिळावे, यासाठी अर्ज केल्यानंतर ते अर्जच संबंधित प्रशासनाकडून गहाळ केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उल्लेखनीय बाब अशी की एखाद्या नागरिकांचा अर्ज गहाळ झाला असता तर एकवेळ बाजु समजण्यासारखी असती. मात्र तब्बल ५० नागरिकांचे अर्ज गहाळ होत असल्याने तहसील प्रशासन किती जबाबदारीने काम करतात, हे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)या नागरिकांचे होते अर्ज४अंकित आखरे, अर्चना आखरे, प्रणाली पाटील, प्राजक्ता किन्नाके, शितल बन्सोड, प्रतिक सरोदे, कोमलसिंग मस्करे, बानो शेख, ज्योती भगत, संजय मुरस्कर, अल्का मुरस्कर, विलास विधाते, शांता विधाते, प्रफुल्ल पाटकर, धम्मदीप बांबोळे, यशकुमार चौहाण, रिमन साहू, पुरुषोत्तम कटरे, विनोद भगत, चंद्रशेखर बन्सोड, गणेश बिश्वास, अंकुश दमाटे यांच्यासह ५० नागरिकांचे अर्ज तहसील प्रशासनाकडून गहाळ झाल्याचा आरोप वनश्री गेडाम यांनी केला आहे.नागरिकांचे अर्ज रितसर भरून तहसीलदारांच्या हातात दिले. जानेवारी महिन्यात कॉर्डाचे वाटप होणार होते. मात्र झाले नाही. त्यानंतर आपण याबाबत वारंवार चौकशी केली. नायब तहसीलदारांनी अर्ज शोधले. मात्र ५० नागरिकांचे अर्जच कुठे मिळाले नाही.-वनश्री गेडाम,नगरसेविका, एमईएल प्रभाग, चंद्रपूर