शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर ...

ठळक मुद्देवंचिताची व्यथा : अधिकाºयांकडून अर्जांला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला़रमेश झाडे यांनी घरकुलसाठी ग्रा.पं.च्या कार्यालयात अर्ज दाखल केले होते़ त्यांचे कुटुंबिय दारिद्र्य रेषेखाली येते़ सदर प्रकार एकट्या रमेश झाडे यांची नसून इतर मागास प्रवर्गातील अनेकांच्या बाबत घडला घडला आहे़ सन २०१६-१७ या वर्षात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील ४४४ दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.त्यासाठी लाभार्थ्यांकडून कागदपत्राची मागणी करण्यात आली होती. कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत घरकुल देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून कोठारी येथे ३४ घरकुल मंजूर झाले. त्यांचे कामही सुरु झाले. मात्र, त्यापूर्वी असलल्या ४४४ पैकी १४४ लाभार्थ्यांना घरकुल नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या लाभार्थ्यांचा पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ठ न केल्याने भविष्यात घरकुलचा लाभ मिळण्याची आशा धूसर झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील बहुतेक कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला़ मात्र दारिद्र्य रेषेखाली इतर मागास प्रवर्गातील गरीबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे.इतर मागास प्रवर्गातील गोरगरीबांचे जीवनमान अतिशय गरीबीचे आहे़मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकतात़ मुलांचे शिक्षण, लग्न करताना त्यांची दमछाक होत आहे. इंदिरा आवास व शबरी योजनेतून अनेक कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींना तसेच सधन कुटुंबानाही लाभ देण्यात आला. पंतप्रधान योजनेत सध्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न असताना त्यांनाही पात्र ठरविण्यात आले आहे.परंतु, जे प्रत्यक्ष योजनेसाठी लाभार्थी आहेत़ ज्यांना घरकुलाची निंतात आवश्यकता आहे़ त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या योजनेची चौकशी करून पात्र व्यक्तिंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे़