शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

चिमूरच्या बाजारओळीत भीषण आग

By admin | Updated: June 27, 2017 00:41 IST

शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली.

७० लाखांचे नुकसान : कापडाच्या गोडाऊनसह चुंचूवार यांचा वाडा जळून खाकलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शहरातील मुख्य बाजारपेठलगत असलेल्या साई मंदिराच्या जवळील छबुताई चुंचूवार यांच्या पुरातन वाड्याला सोमवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने उग्र रूप धारण करून जवळपास असलेल्या तीन दुकानांसह कापडाच्या गोडाऊनला आपले लक्ष्य केले. यामध्ये ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे.शॉर्ट सक्रिट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रमजान ईदच्या पूर्वरात्री काही युवक या चौकातून जात असताना चुंचूवार यांच्या घरातून धूर निघत असताना दिसले. तेव्हा या युवकांनी जनरल स्टोअर्स मालकाला जागवून आगीची माहिती चिमूर पोलिसांना दिली. ठाणेदार दिनेश लबडे हे आपल्या सहकाऱ्यांना घेवून काही युवकाच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर वाढतच गेला. तेव्हा पाहता-पाहता परिसरातील नागरिक घटनास्थळावर जमा झाले. नागरिक मदत करण्यासाठी जे जमेल ते करू लागले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. आगीचे रूद्र रूप बघून वरोरा व उमरेड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत आगीने दोन दुकानासह एका कापड्याच्या गोडावूनला आपले भक्ष्य बनविले. आग विझेपर्यंत छबुताई चुंचुवार यांचा पुरातन वाडा जळून खाक झाला. त्यामध्ये त्याचे ५ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. कांताबाई असावा यांचे कापड्याचे गोडाऊन जळाले. त्यात ३८ लाख रुपयांचे कपडे जळाले. तृप्ती विजय कामडी यांच्या जनरल स्टोर्समधील १ लाख २६ हजार रुपयाचा माल, सुरेश चौधरी यांचे २५ लाख तर चंद्रशेखर डबले यांचे १ लाख ५० हजारांचे साहित्य जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस व युवकांच्या सतर्कतेने टळली जिवीत हानी चुंचूवार यांच्या वाड्यात किरायाने राहणाऱ्या घरात दोन गॅस सिलिंडर होते. मात्र आगीची पर्वा न करता मागचा दरवाजा तोडून काही युवक व पोलिसांनीही सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे स्फोट घडण्यापासून बचावले. मध्यरात्री लागलेली आग विझविताना नागरिकांनी वॉटर टँकर, बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप घेतल्याने टँकर व पाईपनेही आग विझविण्यात नागरिकांना यश येत नव्हते. तर अग्निशन दलाच्या दोन गाड्या पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दोन बमखल मधील पाणीही अपुरे पडले. तेव्हा येथील तपासे यांच्या विहिरीवरून अग्निशमन गाडीत पाणी भरून तब्बल सहा तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.