शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून राख

By राजेश भोजेकर | Updated: June 19, 2023 10:56 IST

सहा तासांनी आगीवर नियंत्रण

चंद्रपूर : बल्लारपूरच्या वस्ती विभागातील गांधी वार्डातील सर्वात जुन्या मोतीलाल प्रभुलाल मालु क्लाॅथ स्टोअर्स या कापड दुकानाला सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे कापड व अन्य साहित्य जळून राख झाले. तब्बल सहा तासांनी आग नियंत्रणात आली. तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज दुकानाचे मालक सुरेश मालू यांनी व्यक्त केला.

पहाटे दोनच्या सुमारास लागलेली ही आग एवढी भयंकर होती. विझवायला बल्लारपूर पेपर मील, चंद्रपूर महानगरपालिका, पोंभुर्णा नगर पंचायत, राजुरा नगर परिषद, भद्रावती डिफेंस, माणिकगड, सीएसटीपीएस चंद्रपूर, अश्या सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ४० फेऱ्या पाण्याचा मारा करून ही आग सकाळी आठ वाजेपर्यंत आटोक्यात आणली.

अग्नीशमन गाड्यांची फजिती

आग विझवण्यासाठी सर्वात आधी शब्बीर अली नगर परिषदची गाडी घेऊन पोहचले. नंतर इतर गाड्या आल्या परंतू दोन्ही बाजूने दुकाने असल्यामुळे व चौकात अतिक्रमणमुळे आग विझवायला अग्नीशमन दलाची फजिती झाली. गांधी वार्डातील दुकाने रस्त्यावर आल्यामुळे सदर परिसर अतिक्रमणांनी वेढलेला आहे. यामुळे दररोज येणाऱ्या जाणाऱ्यांशी हमरीतुमरी होते.

गांधी वार्डातील सर्वात जुन्या बाजारपेठेत दुकाने एकामेकास एवढी खेटून लागलेली आहे. आग भडकलेली असताना अग्नीशमननी केलेल्या पाण्याच्या मारामुळे ती पसरू शकली नाही, नाही तर संपूर्ण परिसर जळून खाक झाला असता. या परिसरात मालूची तीन दुकाने आहेत. त्यांचे कुटूंब ही २० जणासह राहतात. परंतू सावधानीमुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही.

टॅग्स :fireआगballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर