शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कापड दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 10:56 IST

जटपुरा गेट परिसरातील घटना; सतर्कतेने मोठा धोका टळला

चंद्रपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या जटपुरा गेट परिसरात असलेल्या एमफोरयू कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लाखोंचा माल खाक झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील वसंत भवनाच्या चाळीत बरीच दुकाने आहेत. या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते. वाहनांनी गजबजलेल्या वसंत भवनाच्या चाळीत एमफोरयू नावाचे कापड काही वर्षांपासून सुरू आहे. या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. नागरिकांची गर्दी उसळल्याने वाहतुकीचाही खाेळंबा निर्माण झाला. आग लागताच लगेच महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

आगीच्या घटनांची मालिका

चंद्रपुरातील वर्दळीच्या दुकानात व हॉटेलात आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. वर्षभरापूर्वी याच मार्गावरील एका कापड दुकानाला आग लागली होती. या घटनेतही मोठे नुकसान झाले; परंतु आगीचे नेमके कारण पोलिसातून पुढे आले नव्हते. लोकमान्य टिळक शाळेजवळील मद्रास कॅपेलाही काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने आस्थापनांकडून दुकानांची इलेक्ट्रिक तपासणी होते की नाही अथवा आगीमागे विम्यासारखे कारणे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वसंत भवनचे फायर ॲाडिट केव्हा?

वसंत भवन हे जिल्हा परिषदच्या मालकीचे आहे. या इमारतीच्या दुकान चाळीचे भाडे आजच्या बाजारभाड्याच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे इमारतीतून मिळणारा तुटपुंजा उत्पन्न आणि डागडुजीचा खर्च अधिक अशी स्थिती आहे. अल्पभाड्याने वर्षानुवर्षे दुकाने सुरू असलेल्या या चाळीत आग लागल्याने जिल्हा परिषदचे नुकसान झाले. ही भरपाई करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. वसंत भवनचे फायर ऑडिट करा, ही मागणी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी यापूर्वी अनेकदा केली होती. आगीच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :fireआगchandrapur-acचंद्रपूर