शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विजय बावणे यांचा नगरपंचायतीतर्फे सत्कार

By admin | Updated: August 6, 2016 00:45 IST

तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत विजय बावणे यांनी निरपेक्षवृत्तीने काम करून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडण्याचे काम केले.

कोरपना : तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत विजय बावणे यांनी निरपेक्षवृत्तीने काम करून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडण्याचे काम केले. गरीबीची चटके सोसत माणूस म्हणून त्यांनी अनेकांना आधार दिला, असे मत जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संस्थापक विजय बावणे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोरपना नगर पंचायतच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद दत्तात्रेय, अरुण धोटे, श्रीधरराव गोडे, नंदाताई बावणे, प्रभाकर गेडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.विजय बावणे यांचे राजकीय व्यक्तीमहत्त्व असले तरी शेतात राबणारे ते प्रगतशील शेतकरी आहेत. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे कौतुकोउद्गार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर काढले. विजय बावणे जिल्हा बँकेचे प्रथम संचालक बनले तेव्हा कोरपना तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या स्वत:च्या मालकीची मोठी इमारत उभी केली. महिला बचत गटांना रोजगार देण्याचे सतत कार्य केले, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार फराण वहाब यांनी मानले. एटीएमचा शुभारंभ कोरपना येथे एटीएम नसल्याने शेतकरी व नोकर वर्गाला बँकेत तासन्तास उभे राहावे लागत होते. याची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा येथे सुरू करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)