मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:21+5:30

वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड आहे. ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. किड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते. पहिली अवस्था म्हणजे,एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही किड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते.

Fear of locust raids entering the district after Morshi, Arvi | मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

मोर्शी, आर्वीनंतर टोळ धाड जिल्ह्यात दाखल होण्याची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देवेळीच करा उपाययोजना : कृषी विभाग व सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजस्थानातून मध्यप्रदेशात थैमान घालून सातपुडा पर्वत रांगामधुन अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उत्पादक पट्ट्यात टोळधाडीचे थवे पोहोचले आहे. त्यानंतर लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सुद्धा या कीडीचे थवे आल्यामुळे हवेच्या दिशेने वाटचाल करुन किंवा अन्नाच्या उपलब्धतेनुसार ते चंद्रपूर जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी किड आहे. ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पतीचे व झाडाझुडपांचे नुकसान करते. वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव स्किस्टोसेर्का ग्रीगेरिया हे आहे. किड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते. पहिली अवस्था म्हणजे,एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही किड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते. या अवस्थेला समूह अवस्था किवा थव्याची अवस्था असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही किड मोठे अंतर भ्रमण करु शकते व मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करु शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उपाययोजना करण्याचे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जी. नागदेवते, कीटकशास्त्रज्ञ प्रवीण देशपांडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, शेजारील जिल्ह्यात किड दाखल झाल्याने येथे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

असे आहे जीवनचक्र
अंडी अवस्था : या किडीची प्रौढ मादी १५० ते २०० अंडी ओलसर रेताड जमिनीत शेंगासारख्या लांबुळक्या आवरणामध्ये समुहाने घालते. शेंगासारखे आवरण रेतीमध्ये १० ते १५ सेंटीमिटर आत असते. जमिनीतील ओलावा, आद्रता व तापमानानुसार अंडी उगवण्याचा कालावधी १० ते १२ दिवसापासून चार आठवड्याचा असतो.
पिल्लांच्या अवस्था : अंडी उगवल्यानंतर त्यातून या किडीचे पिल्ले बाहेर पडतात. टोळ या किडीच्या एकाकी अवस्थेत पिल्लांच्या ५ अवस्था तर समुह किंवा थवा अवस्थेत पिलांच्या ६ अवस्था असतात. साधारणता ३७ डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास पिल्ले २२ दिवसात तर २२ डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असल्यास या किडीची पिल्ले अवस्था ७० दिवसात पूर्ण होते.
प्रौढ अवस्था : पाचव्या अवस्थेतील या किडीची पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. सुरुवातीच्या काळात प्रौढावस्थेत पंख नाजुक असल्यामुळे ते उडु शकत नाहीत. परंतु, परिपक्व प्रौढावस्थेत ते उडु शकतात. हिच अवस्था पिकांना व झाडांना जास्त नुकसानदायक अवस्था असते.

सर्वसाधारणपणे १० हजार प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा ५ ते ६ पिल्ले प्रती झुडूप अशाप्रकारे किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन शेतकºयांनी गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय योजना करु शकतात. शेतात टिनाचे डबे, प्लॉस्टिक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करुन मोठा आवाज काढल्यास ही किड शेतात बसणे टाळते. शेतात कडूनिंब, धोत्रा इतर तण किंवा पालापाचोळा जाळून धुर व शेकोटीचा वापर केल्यास या धुरामुळे शेतात बसणे टाळेल. या टोळधाडची सवय थव्याने एक दिशेने जाण्याची असल्यामुळे पुढे येणाºया थव्याच्या वाटेवर ६० सेंटीमीटर रुंद व ७५ सेंटीमीटर खोल चर खोदुन त्यात या पिल्लांना पकडता येते. सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होते. त्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून धुर केल्याने किडीचे व्यवस्थापन मिळते. थव्याच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास पाच टक्के निबोळी अर्क किंवा निंबोळी तेल ५० मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी. २० किलो गहू किंवा धानाच्या तुसामध्ये फिप्रोनील ५ एससी ३ मिली मिसळून याचे ढीग शेतात ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होऊन कीटकनाशकांमुळे मरतात.

Web Title: Fear of locust raids entering the district after Morshi, Arvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती