शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

मशीन सेटिंगच्या भीतीने उमेदवारांत धास्ती

By admin | Updated: October 24, 2015 00:34 IST

लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे

अनेक तक्रारी : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याची मागणीखडसंगी : लोकशाहीच्या आधारे भारतात सर्व समुदायाची जनता एकसंघ राहत आहे. ही सर्व किमया भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळेच शक्य झाली आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून जनतेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्र्यापासून, मुख्यमंत्री तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांची जनतेद्वारे निवड केली जाते. २००७ पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात येत आहे. मात्र इव्हीएम मशीन सेट केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत.याच पार्श्वभूमीवर, चिमूर नगरपरिषदमध्ये १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे नगर परिषदेची निवडणूक घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तथा नगर परिषदेतील उमेदवारांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, येत्या नगर पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको या मागणीसाठी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, इव्हीएम मशीनच लोकशाहीस मारक ठरत असल्याची बाब चिमूर तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत मांडली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. या ईव्हीएममध्ये सेटिंग करण्यात येऊन चुकीच्या प्रतिनिधीची निवड होत असल्याच्या तक्रारी प्रात्यक्षिकासह निवडणूक आयोगाला अनेक राजकीय पक्षांनी यापूर्वी सादर केल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पार पडली व बोगस मतदान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला राजू देवतळे, धनराज मालके, प्रकाश बोकारे, राजू हिंगणकर, गिरीश भोपे, सुधीर पंदीलवार, राजू शर्मा, अवी अगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)