शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

एफडीसीएमला जमीन हस्तांतरणास विरोध

By admin | Updated: July 5, 2015 00:54 IST

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता गडचिरोली वन वृत्तातील आलापल्ली वन विभागांतर्गत घोट परिक्षेत्रातील ...

जनभावना तीव्र : अधिक घनतेचे जंगल देण्याचा घाटघोट : भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता गडचिरोली वन वृत्तातील आलापल्ली वन विभागांतर्गत घोट परिक्षेत्रातील ५६००.९९८ हेक्टर वनक्षेत्र वन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात आले आहे. मात्र या वनजमीन हस्तांतरणास घोट परिसरातील नागरिकांचा विरोध कायम असून सदर जमिनीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू देणार नाही, असा इशारा या भागातील नागरिकांनी वन विभागाला दिला आहे. आलापल्ली वन विभागातील घोट परिसरातील ५६००.९९८ हेक्टर जमीन कोका अभयारण्याला देण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे. या शासन निर्णयात ०.४ घनतेपेक्षा कमी जंगल असलेले वनक्षेत्र वन विकास महामंडळाला हस्तांतरित करावयाचे होते. मात्र प्रत्यक्षात ०.६ ते ०.७ घनतेचे घनदाट जंगल वन विकास महामंडळाला हस्तांतरित करीत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक वनक्षेत्र हस्तांतरणाला प्रखर विरोध करीत आहे. घोट वन परिक्षेत्रात उपक्षेत्रांतर्गत २४ खंड व देवदा उपक्षेत्रांतर्गत ५ असे एकूण २९ खंड इतके वनक्षेत्र वन विकास महामंडळाला हस्तांतरित होत असल्याचा संशय या भागातील नागरिकामध्ये बळावला आहे. ०.६ ते ०.७ इतक्या घनतेचे घनदाट जंगल शासन वन विकास महामंडळाला हस्तांतरीत करीत असल्याने या भागात वनावर आधारित उपजीविका असलेल्या नागरिकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पेसा कायद्याच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालाच्या अधिसुचनेनुसार वनक्षेत्राच्या हद्दीतील गौणवनोपजावर व्यवस्थापन व विक्री करण्याचा अधिकार ग्रामसभांना बहाल करण्यात आला आहे. मात्र घोट वन परिक्षेत्रातील मोठे घनदाट वनक्षेत्र एफडीसीएमला हस्तांतरीत होत होत असल्याने ग्रामसभांमार्फत गौण वनोपजाची खरेदी व विक्री करणाऱ्या आदिवासी नागरिकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे एफडीसीएमला दिलेले वनक्षेत्र वन विभागाला परत करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोकाघोट वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३२ मध्ये दोन पट्टेदार वाघ, अस्वल, नीलगाय, चितळ, चौसिंगा, भेकर, रानडुक्कर, शालीदंर, डुमीकखवल्या मांजर, मोर, तडस, रानकुत्रे, कोल्हा, लांडगा, जंगली मांजर, अस्वल, आदीसह विविध प्रकारच्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. या वन परिक्षेत्रातील ५६००.९९८ हेक्टर वनक्षेत्र वन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात आले असल्याने या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामसभेचा ठरावही बेदखलआलापल्ली वन विभागातील घोट वन परिक्षेत्रात पेसा कायद्याच्या राज्यपालाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान घोट वन परिक्षेत्रातील घोट व अनेक ग्रामसभांतर्फे तसेच तेंदू संकलन व वनोपज संकलन, विक्री, व्यवस्थापनाच्या ग्रामसभांच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच या वन परिक्षेत्रातील मोठे वनक्षेत्र वन विकास महामंडळाला हस्तांतरीत केल्यास ग्रामस्थांचा रोजगार हिरावल्या जाणार आहे. त्यामुळे अनेक ग्रामसभांनी वन विकास महामंडळाला वनक्षेत्र हस्तांतरण करण्यास विरोध दर्शविणारा ठराव पारित केला. या ठरावाची प्रत शासन व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला देण्यात आली. मात्र शासन व प्रशासनाने ग्रामसभेच्या ठरावाचीही दखल घेतली नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. शासन एकीकडे पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी नागरिकांना रोजगार देण्याचा कांगावा करते तर दुसरीकडे मोठे वनक्षेत्र एफडीसीएमला देऊन ग्रामस्थांचा रोजगार हिरावते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.