नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र आरक्षण सोडत ही ५६ या संपूर्ण ग्रामपंचायतींची काढण्यात येणार आहे.
प्रवर्गनिहाय विचार करता अनुसूचित जातीकरिता तालुक्यात सात पदे आरक्षित राहणार असून यातील चार पदे महिलांकरिता असणार आहेत. अनुसूचित जमातीच्या ११ पदांपैकी सहा पदे या प्रवर्गातील महिलांकरिता राखीव राहणार आहेत. नामाप्रसाठी १५ असून यातील ७ पदे महिला भूषवतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ पदे आहेत. यातील ११ पदे या प्रवर्गातील महिलांना मिळणार आहेत.
बाँक्स
या ग्रा.पं.कडे सर्वांचे लक्ष
तालुक्यात ५६ ग्रामपंचायती असल्या तरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या काही मोजक्या ग्रामपंचायतींच्याच आरक्षणाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले आहे. यात तळोधी (बाळापूर), सावरगाव, वाढोणा, कानपा, मिंडाळा, पाहार्णी, मौशी, बाळापूर (बुज) या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.