शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी; शिवभोजन थाळीही राहत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, ...

कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या तसेच वेळ वाढवून देण्याची गरज आहे.

बॉक्स

रोज तीन हजार ७०० जणांचे पोट भरते, बाकीच्याचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: तीन हजार ७०० जण घेत असतात. परंतु, अनेकजणांना थाळी भेटत नसल्याने गेल्यापावली परत यावे लागते. एका केंद्रावरुन किमान १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राची संख्या तसेच थाळी संख्या वाढवावी, त्यासोबतच जेवण वितरीत करण्याची वेळ वाढविण्याची गरज आहे.

बॉक्स

बसस्थानक केंद्र : शहरात कामानिमित्त अनेकजण येत असतात. बसस्थानकाशेजारी केंद्र असल्याने अनेकजण या केंद्रावर जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच रांग दिसून येते. परिणामी येथील थाळी लवकरच संपत असते. त्यामुळे साधारणत: दहा ते बाराजण परत जात असतात.

----

जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे येथील केंद्रावरील थाळी लवकरच संपत असते. या केंद्रावर साधारणत: १५ ते २० जण परत जात असतात.

---

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र

२६

रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या ३७००

शहरातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र ७

शहरातील रोज थाळी लाभार्थ्यांची संख्या १०००