शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक कोंडी असताना शेतकऱ्यांना मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकºयांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो.

ठळक मुद्देशेतीचा हंगाम : ऐन पेरणीच्या वेळी पैशाची चणचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन तसेच दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता पावसाळी सुरू झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, मजुरांना मजुरी देताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.यावर्षी बियाणे, खते, कीटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धानाचे बियाण्याचे भाव हजारोंच्या घरात आहे. धान तसेच कपाशीच्या अनेक प्रकारच्या प्रजाती पाहून शेतकरी सुद्धा भांबावले आहेत. याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाण व खते घेऊन शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे.वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यातच मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी डवरणी, फवारणी निंदा काढणे, पिकांची कापणी व मळणी करणे, रोवणी करणे, बाजारापर्यंत माल विक्री करताना त्याचा मजुरांची नितांत गरज पडते. पुरुष व स्त्री मजूर गावात मिळेनासे झाल्याने त्याला इतर गावातून मजूर आणण्यासाठी वाहनाचा खर्चही भरावा लागतो. मजुरी वाढ व बियाणे, खते, औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला शासन व व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सध्या पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र पिकविलेला मालच विकला नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.अनेकांनी धरला शेतीचा मार्गकाही दिवसापूर्वी शेतीला मोठे महत्त्व होते. मात्र मध्यंतरी नोकरीला महत्त्व आले. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आणि बहुतांश तरुणांनी गावाचा रस्ता धरला. त्यामुळे सध्या शेतीला पूर्वीसारखेच महत्त्व प्राप्त होत आहे. मात्र पिकविलेल्या मालाला योग्य भाव तसेच बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेती करणे कठीण झाले आहे. पिकविलेल्या मालाला योग्य भाग मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा ताण पडत आहे. त्यातच आता लॉकडाऊमुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करणे गरजेचे आहे.- संभाशिव जुनगरी,शेतकरी, गोवरी

टॅग्स :Farmerशेतकरी