शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या उदासीन धोरणामुळेच शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 24, 2015 01:58 IST

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ...

चंद्रपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला असताना शासनाची मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात शासनाचे काही धोरणही शेतकऱ्यांविरोधी असल्याने शेवटी नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो, असे प्रतिपादन आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केले.आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्यावतीने १७ ते २४ मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे दोन वेगवगळ्या शेतकरी, शेतमजूर संवाद यात्रा काढण्यात आल्या. विदर्भात ही यात्रा अमरावती, वर्धा नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे १९ मे रोजी दाखल झाली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाण्याचा हा प्रयत्न होता. खांबाडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब नत्थू संबा देठे, अंकेश जनार्धन भोयर यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. या परिस्थितीत कसे लढायचे यावर संवाद साधण्यात आला. अशाप्रकारे चिंचाळा, जामणी, पिजदूरा, ताडगव्हान, येन्सा, शेंबळ आदी गावात आपची संवाद यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली.त्यानंतर वरोरा येथे सभा पार पडली. सभेला आप पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वरोरा येथील आंबेडकर चौकात ही सभा पार पडली. संवाद यात्रा यशस्वी करण्याकरीता जिल्हा संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, जिल्हा सचिव दीपक गोंडे, सतीष परचाके, महापालिका संयोजक प्रशांत येरणे, सुनील मुसळे, योगेश आपटे, सुनील भोयर, संदीप पिंपळकर, भिवराज सोनी, परमजीत सिंग, मनोहर पवार आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)