शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसायाला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:47 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी

आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीचे तंत्र बदलले पाहिजे. शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करून शासकीय योजनांचा पुरेपुर लाभ घ्यावा. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे व शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.राजुरा तालुक्यातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या शेतीला त्यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. राजुरा तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचीे कास धरली व पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. यामुळे मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रगतशिल शेतकºयांच्या भेटी घेतल्या व शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेतले.यात गोवरी येथील रामदास बोथले, पवनी येथील देविदास पडोळे, कापनगाव येथील नंदू रागीट व चनाखा येथील सुहास आसेकर व रिंकु मरस्कोल्हे यांच्या शेतीची पाहणी केली.याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरू पा. जुमनाके, शिवचंद काळे, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रवीण पडोळे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, अशोक नागापूरे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अ‍ॅड. अरुण धोटे, नासीर खान यांची उपस्थिती होती.गोवरी येथील रामदास बोथले यांनी चार एकरात विविध पिकांची लागवड केली आहे. अद्रकच्या शेतीतून मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. पवनी येथील देविदास पडोळे यांनी चार एकरात मागील चार वर्षापासून व्ही.एन.आर. जातीचे पेरू, अ‍ॅपल बोर, सरस्वती सिताफळ, डाळींब लागवड केली आहे. यामुळे कमी जागेत भरपूर उत्पन्न मिळाले आहे. नंदू रागीट यांनी पिझ्झामध्ये वापर होणाऱ्या अ‍ॅल्यपिना जातीची मिरची लागवड केली. चनाखा येथील तरुण शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे.आधुनिक शेती करताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी तालुका पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र उभारले जावे. सुसज्ज माती परीक्षण लॅब, तज्ञ मार्गदर्शकांची चमू, पशुवैद्यकीय अधिकारी यांची सक्षम टीम कार्यरत असणे गरजेचे आहे.- अविनाश जाधवमाजी जि.प. सदस्य.