शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:33 IST

जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला.

ठळक मुद्देजमिनीचे पट्टे द्या : विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. वनअधिकार कायद्याअंतर्गत जबदारन जमिनीचे दावे मान्य न झाल्याने अन्याय होत आहे, असा आरोपही मोर्चाकरांनी केला आहे.वनहक्क अधिकार २००६ नुसार जबरान जमिनीचे हक्क मिळावे म्हणून प्रशासनाकडे दावे सादर करण्यात आले होते. मात्र क्षुल्लक त्रुटी काढून अर्ज फेटाळण्यात आले. इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मंजुरीसाठी तीनपिढ्यांपासून निवास असल्याचा पुरावा सादर करा, अशी अट टाकण्यात आली. याचा जिल्ह्यातील नागरिकांवर अनिष्ट परिणाम झाला. ही जाचक अट रद्द करावी. १९७८ पासून जमिनी कसणाºयांना पट्टे देण्याचा शासनाचा कायदा आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अतिक्रमण धारकांना पट्टे न मिळाल्याने घरकुलपासून वंचित राहण्याची वेळ आली.शेतकरी, शेतमजूर, वनमजूर व ग्रामीण कारागीरांना दरमहा पाच हजार रुपये पेंशन देण्याचा कायदा तयार करावा. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. भूमिअधिग्रहण कायदा २०१३ ची अंमबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात देण्यात आले.यावेळी राज्यकिसान सभेचे महासचिव नामदेव गावंडे, लालबावटा शेतमजूर युनियनचे शिवकुमार गणवीर, आदिवासी महासभेचे नामदेव कन्नाके, डॉ. महेश कोपुलवार, माधव बांते, विनोद झोडगे, संतोष दास, अशोक सोनारकर, बंन्सी सातपुते, हौसलाल राहगंडाले, अनिल घाटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलMorchaमोर्चा