शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:32 IST

आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण : मृग नक्षत्राला प्रारंभ, पण पावसाचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.शेतकरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडयापासून शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यात व्यस्त असतो. यावेळी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. सूर्याचा पारा सातत्याने ४५ अंशापार जात राहिला. तरीही शेतकऱ्यांनी उसंत घेतली नाही. परंतु यावर्षी मृग नक्षत्र लागला तरी पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने तापमान कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु सदर नक्षत्र अत्यंत तप्त आणि कोरडा गेल्याने आजपासून लागणाऱ्या मृग नक्षत्राकडे शेतकºयांच्या नजरा लागून आहेत. आतातरी पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे. परंतु आकाश निरभ्र दिसत असून सूर्याचे आग ओकणेही सुरूच आहे, त्यामुळे शेतकरी काहिसा चिंताग्रस्त झाला आहे. रोहिणी नक्षत्राने शेतकºयांना हुलकावणी दिल्याने तसेच उन्हाचा तडाखा अजूनही सुरूच असल्याने पुढे कशी स्थिती राहील, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी घरातील पारंपरिक बि-बियाण्यांचा वापर करीत असे. परंतु बदलत्या काळाच्या ओघात काही वर्षांपासून पेरणीसाठी संकरित बि-बियाण्यांचा वापर करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या बि-बियाणे, खते यांची जमवाजमव सुरू असून आवश्यक तयारीत शेतकरी गुंतला आहे. तालुक्यात सर्वत्र भातपिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. भात पेरणीपूर्वी मशागतीसाठी बहुसंख्य शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर ट्रील यांना प्राधान्य देत असतात. या यंत्राद्वारे मशागतीची कामे पूर्ण झाली असून पावसाची प्रतीक्षा आहे.उन्हाळी पीक निघालेब्रह्मपुरी तालुक्यात अनेक शेतकºयांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. आता हा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक काढले आहे. आता हेच शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.कृषी केंद्र ओसमृग नक्षत्र लागूनही पावसाचा अजूनही थांगपत्ता नसल्याने तसेच पावसाचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने शेतकºयांनी बि-बियाण्यांच्या व खतांच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती