शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कंपन्या स्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:37 IST

कृषी कंपन्यांचे प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे १० लाखांचा निधी अडवून ठेवला. त्यामुळे लाखोंची यंत्रसामग्री धुळखात पडली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पासाठी वीज पुरवठाच नाहीलाखोंची यंत्रसामग्री धुळखात

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जागतिक बँक अर्थसहाय्य व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाच कृषी कंपन्यांनी शेतमालाच्या क्लिनिंग व ग्रीडींग प्रकल्पासाठी यंत्रसामुग्री खरेदी केली. प्रकल्पाचा २५ टक्के आर्थिक वाटाही उचलला. मात्र, जिल्हा प्रशासनाने या कंपन्यांना वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केल्याने दोन हजार शेतकरी कुटुंबांचा हिरमोड झाला आहे. कृषी कंपन्यांचे प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे १० लाखांचा निधी अडवून ठेवला. त्यामुळे लाखोंची यंत्रसामग्री धुळखात पडली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपुरक व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी होता यावे, याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत मूल तालुक्यात तीन व सिंदेवाही तालुक्यात दोन अशा पाच कृषी कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी १८ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यातील ७५ टक्के वाटा शासन व २५ टक्के शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उचलला. कंपन्या स्थापन करताना शेतकऱ्यांनी सुमारे ५० ते ७५ गावांतील शेतकऱ्यांना भागीदार केले. प्रत्येक कंपनीशी ४०० ते ५०० शेतकरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जुळले आहेत. कंपन्या पंजीबद्ध करून प्रकल्पासाठी लागणारा २५ टक्के म्हणजे ४.५ लाखांचा आर्थिक वाटा शेतकऱ्यांनी उचलला होता. पाचही कंपन्यांनी यंत्रसामग्री खरेदी करण्यापूर्वी टिनशेड अथवा इमारतीचे बांधकामही पूर्ण केले. त्यानंतर शेतमालाचे क्लिनिंग व ग्रिडींग करण्याची यंत्रसामग्री विकत घेतली. पण, प्रकल्पाला वीज पुरवठा नसल्याने यंत्रे धुळखात पडली आहेत.केवळ बैठकांचा फार्सजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात १८ नोव्हेंबर २०१९ रोजी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दरम्यान, विजेचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, केवळ बैठकांचा फार्स सुरू आहे. मात्र, हा प्रश्न अद्याप सुटला नाही. त्यामुळे भागधारक शेतकरीही अस्वस्थ झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेती