शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:48 IST

राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केली खरी, परंतु कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवली आहे.

ठळक मुद्देकधी लिंक फेल तर कधी संकेतस्थळ खुलेना : सेतू केंद्रात शेतकºयांच्या रांगाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राज्य शासनाने शेतकºयांची कर्जमाफी केली खरी, परंतु कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट ठेवली आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे संकेतस्थळ अनेकदा व्यस्त राहात असल्याने एक अर्ज भरण्यासाठी शेतकºयांचा बराच वेळ जातो. त्यामुळे सेतू केंद्रात अजुनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगाच दिसून येत आहेत.शासनाने कर्जमाफी केली. मात्र वेळोवेळी सरकारने कर्जमाफीचे निकष बदलविल्याने शेतकरी पुरते गोंधळात पडले. नेमकी कर्जमाफी कुणाला, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत आहे. सरसकट कर्जमाफी करून सरकार शेतकºयांवर मेहरबान असल्याचे भासवत आहे. परंतु, सरसकट कर्जमाफी झाली कुणाला, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे.राज्य शासनाने २००९ पासून शेतकºयांची कर्जमाफी केली. परंतु, नियमित कर्ज भरणाºया प्रामाणिक शेतकºयांचे काय, सरकार या शेतकºयांवर अन्याय का करीत आहे. नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना २५ टक्के अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. ही २५ टक्के अनुदानाची घोषणा तशी नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांवर अन्याय करणारी आहे.पोटाला चिमटा घेत बायकोच्या अंगावरचे दागदागीने विकून शेतकºयांनी कर्जाची परतफेड केली. मग अशा कर्ज भरणाºया शेतकºयांवर सरकारने अन्याय का केला, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कर्जमाफीचे आॅनलाईन फार्म भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख शासनाने जाहिर केली आहे. परंतु लिंक फेल आणि आपले सरकार सेवा केंद्राचे संकेतस्थळ नेहमीच व्यस्त राहत असल्याने एका-एका अर्जासाठी शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये ताटकळत बसावे लागत आहे.अजुनही बहुतांश शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरलेले नाही. नेट बरोबर काम करीत नाही तर कधी संकेतस्थळ खुलत नाही. त्यामुळे कर्ज माफीचे आॅनलाईन फार्म भरण्यास उशीर होत आहे, असे इंटरनेट कॅफे संचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजूूनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगाच लागल्या असून शेतकºयांची ससेहोलपट होत आहे.कधी संपणार शेतकºयांचा संघर्ष?कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना शेतीची कामे सोडून शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. परंतु, ई-सेवा केंद्रात अजुनही शेतकºयांच्या रांगाच असल्याने शेतकºयांना आल्यापावली परत जावे असल्याचे दिसून येत आहे.शुल्काच्या नावावर वसुलीकर्जमाफीचे अर्ज कोणत्याही शुल्काविना भरून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. तसेच प्रत्येक सेतू केंद्र संचालकांना जिल्हाधिकाºयांनी पत्र पाठवून शुल्क आकारू नये, असे कळविले आहे. मात्र सेतू केंद्र संचालक शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शुल्काच्या नावावर २० ते ३० रूपयांची आकारणी करीत आहेत.