अनिल किलोर : पश्चिम महाराष्ट्राचे नेते दरोडेखोरराजुरा : येथील भूमीपुत्र युवा संघटनेच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी आयोजित शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी व वेगळ्या विदर्भासाठी शनिवारी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राचे नेते दरोडेखोर आहेत, असे प्रतिपादन अॅड. अनिल किलोर यांनी सभेत केले. यावेळी राजुरा शहरातून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शरद निंबाळकर, बाळासाहेब कुळकर्णी, माजी आमदार सुदर्शन निमकर, हरिदास झाडे, अशोक डोहे, अमर बोडलावार, कैलास राठोड, लता ठाकरे, पूजा मडावी, नंदिनी मालोदे, सुमन शेळके, बापूराव मडावी, सुप्रिया निमकर उपस्थित होते.संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार बापूराव मडावी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
वेगळया विदर्भासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर
By admin | Updated: April 10, 2016 00:50 IST