शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो सावधान; बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून मापात घोळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:06 IST

बाजारात शेतकऱ्यांची लूट : बाजार समितीने करावी चौकशी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यात सद्य:स्थितीत शेतकऱ्यांची धान पिकांची मळणी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे मळणी करून धान विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेल्या दरापेक्षा जास्त दराने खरेदीचे आमिष दाखवत वजनकाट्यातून सर्रास लूट करीत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

बहुतांश शेतकरी पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री करायचे. मात्र, या ठिकाणी चुकारा पैसे मिळण्यास वेळ लागतो व गावात व्यापारी जास्त दर देऊन नगदी पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बांधावरच विक्री करण्यात वाढला आहे. शेतकरी धान पीक लागवडीपूर्वी बँकांचे कर्ज, महिला बचत गटांचे कर्ज वेळप्रसंगी हातउसने पैसे घेऊन शेती पिकवितो. मात्र, घेतलेल्या कर्जाचे देणे घेणे करण्याकरिता धान हातात आल्याबरोबर शेतकऱ्यांना पैसे हवे असतात. त्यामुळे धानाची मळणी झाल्याबरोबर धान पीक शेतकरी लगबगीने विकतो. याचाच फायदा व्यापारी घेत असल्याची ओरड आहे. 

चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो ? व्यापारी गावात फिरून किंवा मळणी झाल्याबरोबर लगेच शेतातच येतात. तिथेच शेतकरी व्यापाऱ्याला धान विक्री करीत आहेत. मात्र, यावेळी व्यापाऱ्यांनी मूल येथील बाजारपेठेपेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे जास्त दर देऊन खरेदी सुरू केली आहे. मूलला नेऊन राईस मिलला हे धान विक्री करतात. असे असले तरी जास्तीचा दर व मूलपर्यंतचे भाडे क्चिटलमागे जवळपास ६० रुपये हा खर्च कुठून काढत असतील. तोट्यात तर व्यवसाय करणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मापातच पाप आहे, असा आरोप सुज्ञ शेतकयांनी केला आहे.

इलेक्ट्रिक काट्यात सेटिंग? वाहतुकीसाठी सोईस्कर व्हावे म्हणून अनेक व्यापारी इलेक्ट्रिक काट्यांनी धान खरेदी करतात. मात्र, या काट्यामध्ये तीन ते पाच किलोंची सेटिंग होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

"धान मळणी सुरू असून कर्जाचे देणेघेणे असल्याने मळणी झाल्याबरोबरच धान विक्री करावी लागत आहे. गावातच बांधावर शेतकरी धान विकणे पसंत करीत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून वजनमापात बदल करीत आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वजन काट्यांची चौकशी करावी."- भीमराव डोर्लीकर, शेतकरी गडसुर्ला.

"दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून दोन व्यापाऱ्यांचे वजन काटे जप्त केले होते. अधिक नफा कमविण्याच्या लालसेने असे प्रकार घडतात. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल." - अजय गंटावर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मूल.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती