शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भोयगाव-गाडेगाव फाट्यावर शेतकरी संघटनेचे ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:48 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झालेल्या कोरपना तालुक्यातील भोयेगाव- गडचांदूर रस्त्यांच्या ...

लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल : रस्त्याचे काम अद्यापही प्रस्तावितचनांदाफाटा : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झालेल्या कोरपना तालुक्यातील भोयेगाव- गडचांदूर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ८५ कोटी रूपये मंजूर केल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. मात्र सदर रस्त्याची मागणी कागदोपत्रीच प्रस्तावित असून अजूनही या रस्त्याला निधी अभावी तांत्रिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शुक्रवारी शेतकरी संघटनेने रोष व्यक्त करीत रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव दिवे, समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, पं.स. सभापती रवी गोखरे, माजी जि.प. सदस्य अशोक मुसळे, तालुकाध्यक्ष मारोती काकडे, पोर्णिमा निरंजने, माजी उपसभापती मदन सातपुते, गणपत काळे, शांताराम पानघाटे, परशुराम गोखरे आदी उपस्थित होते. भोयेगाव रस्त्याच्या मंजुरीबाबत खुलासा करताना चटप यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे पत्र आंदोलकांना वाचून दाखविले. यावेळी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, ठाणेदार विनोद रोकडे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चटप यांनी माण्यांचे निवेदन एसडीओंना सादर केले. तब्बल दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनाने जडवाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यशस्वीतेसाठी शेतकरी संघटनेचे तालुका सचिव अरुण रागीट, युवा नेते अनिल चपट, उपसरपंच नरेश सातपुते, मोरेश्वर आस्वले, बबन पिदूरकर, चंदू चटप, अरुण काळे, विलास आगलावे, आशिष मुसळे, सरपंच पोतराजे, कैलाश कोरांगे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)शेतकऱ्यांचा बैलबंड्यासह सहभागआंदोलनात परिसरातील तळोधी, एकोडी, भोयेगाव, खैरगाव गावातील शेतकऱ्यांनी बैलगाड्या उभ्या करून रस्ता रोको केले व शासनाविषयी चिड व्यक्त केली. यावेळी भजनातूनही शासनाला रस्त्याची मागणी करण्यात आली. यात शेतकऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.