शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

शेतकरी यंदाही आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीनंतरही हंगाम धोक्यात : सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादूर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा सोयाबिन व कापसाच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र कर्जमाफीनंतरचा हा पहिलाच हंगाम असूनही शेतकऱ्यांपुढे येत असलेल्या नवनव्या अडचणीमुळे यावर्षीही आर्थिक अडचणींना सामोर जावे लागण्याची शक्यता शेतकरी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.नेहमीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पिवळे पडले. शेगांना गळती लागली आहे.मृग नक्षत्राच्या पावसावर सोयाबीनची पेरणी झाली. समाधानकारक पाऊसही पडला. पीक बहरायला लागले. पिकांची वाढही झाली. शेंगा लागल्या. मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे शेंगाच भरल्याच नाही. परिणामी शेतकरी पुन्हा हताश झाले आहेत. यंदा झालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पीकाची सध्याची परिस्थिती बघता केलेला सोयाबीनवर केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे अर्थच्रक कोलमडेल की काय, अशी भीती व्यक्त होताना दिसून येत आहे.उताऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्षयंदा अनेक शेतकरी सोयाबीन पिकांकडे वळले आहेत. परंतु, यंदा हवामानामुळे हे पीक न परवडणारे ठरतील की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. काहींनी उभ्या पिकांत जनावरे सोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही शेतात पीक उभे आहे. अवघ्या काही दिवसावर मळणी पाहता किती उतारा होतो. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आधिच सततची नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या उत्पन्नावर आर्थिक देवाण-घेवाण अवलंबून असते. मात्र यावर्षी आलेल्या सततच्या संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती