शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार गाळपेर जमीन; राज्य शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:29 IST

राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती बघता सर्व जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, याकरिता राज्य शासनाने गाळपेर जमीन शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपये हेक्टर दराने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे केवळ एक रुपया हेक्टर शुल्क आकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती बघता सर्व जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, याकरिता राज्य शासनाने गाळपेर जमीन शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपये हेक्टर दराने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पंचायत समित्यांशी संपर्क करावा लागणार आहे.तलाव व पाणीसाठा क्षेत्रातील पाणी उतरल्यानंतर सुपिक जमिनीला गाळपेर क्षेत्र म्हणतात. याचा वापर करण्याचे शासनाने धोरण जाहीर केले आहे. आपल्या राज्यात जिल्ह्यात काही भागांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरवर्षी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे परिणामी चारा पिकात घट झालेली आहे. त्यामुळे पशुधनसाठी लागणारा चारा उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक व मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे जिकरीचे जाणार आहे. संभाव्य उदभवणाऱ्यां परिस्थितीवर उपाय योजना म्हणून शासनाकडून एक रुपया प्रति हेक्टर या नाममात्र दरावर, प्रकल्पाच्या किंवा जलाशयाच्या काठावरील जागा, काठावरील जमीन ही वैरण लागवडीकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या पिकांकरिता आवश्यक असलेले पाणी लगतच्या तलावातून विनामूल्य उपासा करण्याकरिता उपलब्ध केले जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात ३२५६ हेक्टर जमीनचंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिंपरी, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर अशा १२ तालुक्यांमध्ये ३२५६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या तालुक्यांमधील प्रकल्पालगतच्या उपलब्ध जमिनीची माहिती पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे मिळेल. जलसंपदा विभागाकडून या जमिनी उपलब्ध केल्या जाणार आहे.गुरांच्या चाऱ्याची उपलब्धता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना चारा उत्पादन करण्यासाठी जमिनी उपलब्ध करुन दिल्या जातील. यासाठी शासनाकडून मोफत बियाणे उपलब्ध होणार आहे.

-डॉ. कुणाल खेमणार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेती