शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:53 IST

नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते.

ठळक मुद्दे शेतकरी चिंतेत : शासनाने भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमिंडाळा : नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी आशा होती. परंतु बदलत्या हवामानाचा धान पिकावर परिणाम झाला. बेरड, मावा, तुडतुडा, करपा आणि कडा करपा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी यंदा धानाच्या उतारीत मोठी घट आली आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.परिसरातील शेतकºयांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या दूरच्या शहरातील कृषी केंद्रामधून औषधी खरेदी करून पिकावर फवारणी केली. परंतु, धान पिकावरील रोग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. बळीराजाने शेवटच्या क्षणापर्यंत पिकावर औषधांची फवारणी केली. पण पिकात काहीच सुधारणा झाली नाही.परिसरातील तुकूम तिव्हर्ला या शिवारातील शेतकरी वसंत बळीराम चिलबुले यांची गट नं. ३०१ मध्ये ४४ हे.आर. शेत जमीन आहे. त्यांनी रोवणी केली. जेव्हा पीक कापणीला आले तेव्हा धानाचे लोंब अपूर्ण अवस्थेत भरलेले दिसले. नमुना म्हणून एका बांधीतील धानाची कापणी व मळणी करून पाहिली. तेव्हा उतारी फार कमी आली.या शेतकºयाने धान पिकाकरिता जवळपास दीड लाख रुपये खर्च केले. मात्र उत्पादन फार कमी झाल्यामुळे सावकार व बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सापडले आहेत. असाच प्रकार अनेक शेतकºयांसोबत घडला असून धानाची मळणी केल्यानंतर त्यांना सुद्धा एकरी तीन ते चार पोते उत्पादन हाती आले आहे.बजेट कोलमडलेगेवरा (बु) : धानाच्या मळणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे भरघोष उत्पन्नाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. एकरी धानाची उतारी सहा ते सात पोते उत्पन्न होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट बिघडल्याने नैराश्य दिसून येत आहे. उशिराच्या पावसाने का होईना, धान जोमात वाढून आले. परंतु मावा, तुडतुडा, कीड यासारख्या अनियंत्रीत रोगांनी धान पीक उद्धवस्त करून टाकले. मळणीच्या शेवटी पोत्यांची नव्हे तर एकरी बोली लावण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या शेतात एकरी बांधण्यात आलेले भारे धानाच्या गंजीत जास्त दिसत असले तरी उतारी फार अत्यल्प आहे. त्यामुळे मळणी यंत्राच्या इंधन खर्चाबरोबर मजुरांना पोत्यामागे देण्यात येणारी मजुरी सुद्धा निघणे कठीण आहे. दुसरीकडे रोवणी, कापणी आणि बांधणीचे यावर्षी वाढलेले मजुरीचे दर, कीटकनाशकांच्या बेसुमार किंमतीचा खर्च या सर्व बाबींचा विचार केल्यास धान उत्पादकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.विमा काढूनही लाभ मिळणार की नाही ?यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक व सेवा सहकारी सोसायट्यांकडून धान पिकाचा विमा उतरवून घेतला आहे. त्याकरिता हप्ता सुद्धा भरलेला आहे. परंतु उत्पादन फक्त २० टक्केही झाले नसताना आजपर्यंत शासनाचा व विमा कंपनीच्या कोणत्याही प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जावून पंचनामे केले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.