शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेत कोरडे आणि पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली.

ठळक मुद्देशिवारातील वास्तव । आभाळाकडे लक्ष, पिकांच्या उभारीसाठी पाण्याची गरज

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांची अवस्था पळता भूई थोडी झाली आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात नैसर्गिक पाणी, मोटारपंप व इतर साधनांनी पाणी करीत रोवणी आटोपली. मात्र पाण्याअभावी रोवणी काळवंडाला लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. एवढेच नाही तर रोवण्यासाठी तयार असलेले पऱ्हे सुकायला लागली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण धानपट्ट्या जवळपास अशीच स्थिती दिसून येत आहे.नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. या पिकावरच या तालुक्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. हे पीक घेण्यासाठी साधारणत: जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हेटाकले जातात. पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपलेल्या पावसाच्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस या धानपट्ट्यातील तालुक्यांत पडला नाही. काही शेतकऱ्यांनी मोटर आणि इंजिनच्या पाण्यावर रोवणी केली. नागभीड, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यांचे कृषी विभागाचे उपविभागीय कार्यालय नागभीड येथे आहे. उपविभागीय अधिकारी डी. एम. तापसकर यांना विचारणा केली असता या तिन्ही तालुक्यात अद्याप ३० ते ३२ टक्के रोवणी बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली.४० टक्के शेतकऱ्यांनी काढला विमानागभीड उपविभागातील नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या तालुक्यात ७८ हजार शेतकरी आहेत. या ७८ हजार शेतकºयांपैकी ३८ ते ४० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे. मुदतवाढ मिळाली तर आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे.खत उपलब्ध, पण टाकू शकत नाहीसद्यस्थितीत कृषी केंद्रांमध्ये खत उपलब्ध आहे. मात्र रोज कडक आणि जीवघेणे उन्ह पडत असल्याने शेतकरी रोवणी केलेल्या धानास खताची मात्रा देण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. खताची मात्रा दिली आणि पाऊस आलाच नाही तर आधीच काळवंडत चाललेले धान पुन्हा काळवंडेल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस