शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कुटुंबाचा आधार हिरावला, गाव झाले सुन्न

By admin | Updated: July 14, 2016 00:56 IST

मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार...

३६ तासानंतरही पत्ता नाही : शोध मोहीम सुरूच रवी रणदिवे ब्रह्मपुरी मंगळवारच्या घटनेमुळे लाडज गाव सुन्न झाले आहे. वैनगंगेत नाव उलटण्याच्या घटनेला ३६ तास होऊनही अद्याप माधव मैंद व सचिन चनेकार या दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही. कितीतरी वर्षापासून गावकरी नावेने नदीतून ये-जा करतात, मात्र असा दुर्धर प्रसंग कधीच ओढवला नव्हता, त्यामुळे ही घटना अख्ख्या गावाच्या जिव्हारी लागली आहे. दिवसभर गावकरी नदीच्या काठावर बसून ‘ते’ दोघे आतातरी परत येतील, किमान त्यांची बातमी तरी कानी येईल, या आशेने प्रतिक्षेत होते. मात्र सायंकाळचा अंधार पडायला लागला तरी कसलीही बातमी कानावर न आल्याने गावकरी सुन्न मनाने पुन्हा गावाकडे परतले आहेत. मन विषन्न करणारे हे चित्र आहे लाडज या गावचे. घडलेल्या घटनेमुळे व त्यातल्या त्यात दोघे वाहून गेल्याने लाडजवासीयांची मानसिकता कमालीची व्याकुळली आहे. वाहून गेलेले माधव मैंद हे घरचे कर्ते पुरूष होते. घरी दीड एकर शेती, तीन मुले व पत्नी असा संसाराचा गाडा चालवित असताना वैनगंगेने असा अचानक कोप केला. सचिन चंडीकार हा अविवाहित असला तरी आईवडीलांचा आधार होता. हा आधारच नियतीने हिरावून नेल्याने आईवडीलांचे शब्दही आता मुके झाले आहेत. शून्यात दृष्टी लावून ते मुकपणे आसवे गाळत आहेत. दोघेही वाहून जाणारे कर्ते असल्याने व घरची परिस्थिती हालाखिची असल्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न पडला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या वैनगंगेने आजवर या गावच्या पिढ्या पोसल्या, तिच वैनगंगा अशी वैरी कशी होऊ शकते, हा प्रश्न गावालाच अस्वस्थ करून जात आहे. वैनगंगेच्या पुरामुळे गावाला धोका असल्याने १९९४ मध्ये सरकारने या गावाचे पुनर्वसन केले होते. मात्र निव्वळ सुपिक शेतजमिनीच्या प्रेमापोटी गावकरी गावातच राहात आहेत. आजवर ठिक चालत राहिले, मात्र मंगळवारच्या घटनेमुळे हे गाव भयभीत झाले आहे. जीवावर उदार होऊन शेती कसण्यापेक्षा पुनर्वसन झालेल्या नव्या ठिकाणी राहायला जायचे की याच काळ्या मातीची सेवा चालू ठेवायची, असा प्रश्न या गावाला पडला आहे. कालपासून दिवसभर त्यावरच गावाचे विचारमंथन सुरू आहे. प्रशासन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त भुमिकेतून पुढे काहीतरी निर्णय निघणार की जगण्यामरण्यातील ही झुंज अशीच सुरू राहणार, हे येणारा काळच ठरवेल. लाडजला पुराने अनेकदा वेढले तरीही केवळ काळ्या आईच्या सेवेसाठी गावकरी संकटे झेलत राहीले. येथील सुपिक शेतीमुळे कष्टाचे चीज झाले. आर्थिक सुबत्ता आली. त्याच काळ्या आईला सोडून जाण्याच्या कल्पनेने गावकरी कमालीचे हळवे झाले आहेत. रोख पिके देणारी ही शेती या गावाचा आधार होती. त्या बळावरच या गावाने पोटची मुले उच्च शिक्षणासाठी दूर ठेवली होती. त्यामुळे येथील मातीशी या गावाचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच प्रशासनही गावकऱ्यांसमोर हतबल झाले आहे. मात्र आता हा मोह आवरण्याचा इशारा कालच्या घटनेने दिला आहे. तो सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे. लाडज येथे आमदारांची नागरिकांसोबत बैठक वैनगंगा नदीत वाहून गेलेले माधव मैंद व सचिन चनेकार यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. आमदार बंटी भांगडिया, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, उपपोलीस विभागीय अधिकारी प्रविण परदेशी, प्रभारी तहसीलदार पुंडकर यांनी गावात येवून गावकऱ्यांशी चर्चा केली. धोका लक्षात घेवून पुनर्वसन का गरजेचे आहे, हे पटविण्यचा प्रयत्न केला. या बैठकीला सर्वच गावकरी उपस्थित होते.