लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जनता कर्फ्यु या आवाहनाला प्रतिसाद देतानाच, घरच्यांसोबत राहण्याचा आनंद लोकप्रतिनिधींनीही लुटला.चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांनी रविवारचा दिवस आपल्या परिवारासह जुन्या आठवणींना उजाळा देत घालवला. जुने अल्बम काढून त्यातील छायाचित्रे पहात अख्खे जोरगेवार कुटुंब रमून गेले होते. एरव्ही घरात पाय न टिकवू शकणारे लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांप्रमाणेच घरातील ज्येष्ठ व लहान मुलांसोबत वेळ घालवण्यात मश्गूल झाले होते.
coronavirus; लोकप्रतिनिधींचं कुटुंब रंगलंय हास्यविनोदात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:00 IST