एकमेकांबद्दल स्नेहभाव निर्माण व्हावा या उद्देशाने मकरसंक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकांना भेटवस्तू देऊन तिळगूळ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दरवर्षी मकरसंक्रातींच्या तोंडावर तीळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ होत असते. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. मागील वर्षी १ किलो तीळ १२५ ते १४० रुपयांना मिळायचे. मात्र यंदा १२० रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध आहे. साखर ३६ रुपयेवरुन ३५ रुपये किलो तर गूळ ३५ रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध आहे. केवळ तेलाचे भाव यंदा कडाडले आहेत.
बॉक्स
तीळ १२० रुपये किलो
मागील वर्षी तीळ १२५ रुपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध होते. आता नव्याने तिळाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे १२० रुपयांपासून १४० रुपयांपर्यंत तीळ उपलब्ध आहेत.
गूळ ३५ रुपये किलो
बाजारपेठेत हलक्या प्रतीच्या गुळापासून उच्च प्रतीचा गुळ उपलब्ध आहे. साधरणत: ३५ रुपये किलोपासून ६० रुपयांपर्यंत गूळ उपलब्ध असून मागणीही वाढली आहे.
साखरेच्या भावात घसरण
काही दिवसापूर्वी साखर ३६ ते ३८ रुपये प्रति किली विक्रीला होती. मात्र आता त्याचे दर घसरले असून ३५ रुपये प्रति किलो झाले आहे. त्यामुळे संक्रांतीचा गोडवा वाढणार आहे.
कोट
केवळ एक ते दोन रुपये प्रतिकिलोमागे भाव कमी झाले आहे. कोरोनामुळे सर्वाना अर्थिक अडचण भासत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दरवाढ कमी झाली असली तरी यंदा संक्रांत कडवट होणार आहे.
- प्रतिभा कोडापे, गृहिणी
तिळाचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत तर साखर व गुळाचे भाव स्थिर आहेत. संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली असूनही पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांचा ओढा दिसून येत नाही.
- मोतीलाल टहलियानी, व्यापारी, मूल.