शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वलनी येथे आढळला बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून  अवैधरीत्या विकत होता.  याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दोन पथके तयार करून (तळोधी बा.) येथील सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर धाड टाकली. तिथे २५ ते ३० वयोगटातील मुलांना सोबत घेऊन  आरमोरी येथील सलमान आरिफभाई कासवानी हा सुगंधित तंबाखू मशीनच्या साहाय्याने भेसळ करताना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा. : बनावट सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या एका छोटेखानी कारखान्यावर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला. यात २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, आठजणांना अटक करण्यात आली आहे.मुख्य आरोपी सलमान आरिफभाई कासवानी (२७, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांच्यासह सागर तेजराम सतीमेश्राम (३३, रा. खंडाळा तह. साकोली, जि. भंडारा), रोहित माणिक धारणे (२२, रा. गोगाव, ता. ब्रह्मपुरी), वैभव प्रभाकर करकाडे (२४), रा. ब्रह्मपुरी, सागर संजय गजभिये (२४, रा. सांगिडी, ता. साकोली), वैभव भास्कर भोयर (२२, रा. भगतसिंग चौक, आरमोरी), मयूर सुरेश  चाचरे (२७,  रा. सांगिडी, ता. साकोली, खेमराज विलास चटारे (२०, रा. आरमोरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा वलनी गावापासून पूर्वेस अर्धा कि.मी अंतरावर असलेल्या सचिन वैद्य (रा. तळोधी बा.) यांच्या फार्महाऊसवर सलमान आरिफभाई कासवानी (रा. आरमोरी) हा मजा, ईगल व हुक्का अशा कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून  अवैधरीत्या विकत होता.  याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दोन पथके तयार करून (तळोधी बा.) येथील सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर धाड टाकली. तिथे २५ ते ३० वयोगटातील मुलांना सोबत घेऊन  आरमोरी येथील सलमान आरिफभाई कासवानी हा सुगंधित तंबाखू मशीनच्या साहाय्याने भेसळ करताना दिसून आले.  यावेळी एक हजार किलो सुगंधित तंबाखू, वेगवेगळ्या मशीन, वजनकाटा, सीलिंग मशीन, बारकोड मशीन, लाकडी मशीन, मिक्सर मशीन व इतर साहित्य असा एकूण २५ लाख ७१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, सहायक फौजदार राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सुरेंद्र महंतो, गणेश  मोहुर्लै, संतोष येलपुलवार, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, गणेश भोयर, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, आदींनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदी