शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मोबदल्यासाठी निराधारांची फरफट

By admin | Updated: January 14, 2017 00:40 IST

शासनाच्या नोटबंदीचा फटका ग्रामीण भागातील निराधार लाभार्थ्यांना बसला आहे. त्यांना बॅकेत रांगेत उभे राहून पैसे काढणे जिकरीचे झाले आहे.

नोटबंदीचा फटका : क्षमता नसताना रागेंत उभे राहण्याचा संघर्षपोंभुर्णा : शासनाच्या नोटबंदीचा फटका ग्रामीण भागातील निराधार लाभार्थ्यांना बसला आहे. त्यांना बॅकेत रांगेत उभे राहून पैसे काढणे जिकरीचे झाले आहे. तरुण व्यक्तींच्या धक्काबुक्कीत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोटबंदीमुळे निराधारांची फरफट सुरू झाली आहे. शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धपकाळ योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अनेक निराधार गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नारिक व वृद्ध महिला घेत आहेत. मात्र बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम काढण्यासाठी या निराधार लाभार्थ्यांना नोटबंदीच्या फटक्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वृद्ध रांगेत उभे असताना चक्कर येवून पडण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत. अनेक वृद्ध हातात काठीच्या आधाराने एक कि.मी अंतरावरुन बँकेतून पैसे काढण्यासाठी येत आहेत. ते पोहोचल्या बरोबर रांगेत उभे राहतात. त्यातच बँकेमध्ये ५०० रुपयांची नवीन नोट न आल्याने केवळ दोन हजार रुपयांची नोट मिळत आहे. वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दोन महिन्याचे १ हजार २०० रुपये मिळत आहेत. परंतु नोटांअभावी बँकेलासुद्धा निराधारांचे मानधन अदा करणे कठिण जात आहे. परिणामी या निराधारांना अनेकदा आल्या पावलीच परत जावे लागत आहे. तर देवाडा खुर्द येथील वैनगंगा कृष्णा बँकेमध्ये एक दिवसा आड दोन हजार रुपयेच मिळत असल्याने बँकेतील खातेदारांची प्रचंड रांग लागत असते. त्यात तरुण वर्ग वृद्ध लाभार्थ्यांना धक्के मारीत असतात. त्यामुळे वृद्धांचे हाल होत आहेत. बँकेचे कर्मचारी आत असल्याने त्यांना बाहेरील प्रकार काहीच माहिती नसतो.रांगेमध्ये उभे असताना धक्काबुकीमध्ये एका निराधार लाभार्थ्यांच्या अंगावर अनेक तरुण पडले. सुदैवाने तो व्यक्ती बचावला. तसेच अनेक महिलांमध्ये लाईनमध्ये उभ्या असताना अंगावर पडल्याचे वास्तवसुद्धा पहायला मिळाले. (तालुका प्रतिनिधी)