डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प, हजारो ज्येष्ठांसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:29+5:302021-05-13T04:28:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटक या कामात गुंतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटक या कामात गुंतला आहे. त्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत आहेत. विशेष म्हणजे, नेत्रशस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील किमान तीन हजारांवर ज्येष्ठांच्या नेत्रशस्त्रक्रिया रखडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच या शस्त्रक्रिया होणार आहेत.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना काळात आरोग्य विभागानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. त्याचा फटका नेत्र रुग्णांनाही बसला आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना लाट ओसरल्यानंतर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शस्त्रक्रिया ठप्प आहेत.
बाॅक्स
शासकीय रुग्णालयात कोरोनापूर्वी महिन्याला होणाऱ्या शस्त्रक्रिया
३६०
गेल्या वर्षभरातील नेत्र शस्त्रक्रिया ४५०
कोट
कोरोनापूर्वी नियमित नेत्रशस्त्रक्रिया केल्या जात होत्या. कोरोना विषाणू संसर्गामुळे सामान्यत: नागरिक शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नाहीत. सद्यस्थितीत नेत्रशस्त्रक्रिया बंद आहे.
- डाॅ. निवृत्ती राठो़ड
जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर
---
कोट
अंधार कधी दूर होणार...
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तपासणीसाठी गेल्यानंतर सद्यस्थितीत शस्त्रक्रिया बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
- विठ्ठल पिंपळकर, चंद्रपूर
--कोट
मागच्या महिन्यामध्ये डोळे दाखवण्यासाठी गेलो असता, शस्त्रक्रिया करावी लागणार, असे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, आता कोरोनाचे संकट असल्यामुळे रुग्णालयात जाण्यासही भीती वाटते. कोरोना लाट संपल्यानंतरच रुग्णालयात जाणार आहे.
- घनबा वनकर, चंद्रपूर