शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नियमांना डावलून पोकलेनद्वारे वाळूचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

गेल्या सलग दोन वर्षांपासून रेती घाटाचे रखडलेले लिलाव यावर्षी करण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांनी कोट्यवधींच्या घरात बोली बोलून कंत्राट घेतले. प्रशासनामार्फत वाळूचे कंत्राट मिळताच लिखितवाडा व सोमनपल्ली या घाटावरील अधिकृत कंत्राट घेणाऱ्यांनी उत्खननाचा सपाटा लावण्यासाठी खनिकर्म विभागाची नियमावली पायदळी तुडवून चक्क पोकलेन मशीनच्या साहाय्याने सीमांकन क्षेत्राबाहेर व सीमांकन क्षेत्रात खोलवर उपसा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. 

वेदांत मेहरकुळेलोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी :  तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यामुळे मुबलक प्रमाणात रेतीसाठा आहे. अशातच दर्जेदार रेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या लिखितवाडा येथील अंधारी नदीवरील रेतीघाटाचा शासनाने नुकताच लिलाव केला. सदर लिलावाचा कंत्राट घेणाऱ्यांनी अक्षरश: खनिकर्म विभागाच्या नियमांची पायमल्ली करीत सीमांकन क्षेत्राहून अधिक खोलवर वाळू उपसा करण्यासाठी पोकलेन मशीनचा नियमबाह्य वापर करून खुलेआम उपसा करीत असल्याचे दिसते. यामुळे पर्यावरण व नदीपात्रास आगामी काळात धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे.  दिवसाढवळ्या चालणाऱ्या या वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तालुक्यातील अंतर्गत मार्ग प्रभावित होत असून महसूल विभाग मात्र या संपूर्ण प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात वाळूचा साठा जमा होतो. अशातच येथील दर्जेदार वाळूची प्रचंड प्रमाणात मागणी असल्यामुळे जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक कंत्राटदार दरवर्षी तालुक्यातीलच घाटावरून वाळू नेण्यासाठी वैध व अवैध मार्गाचा अवलंब करतात. अशातच यंदाचे वर्षी तालुक्यातील सोमनपल्ली व लिखितवाडा येथील दोन्ही रेती घाटांचे प्रशासनामार्फत लिलाव करण्यात आले. गेल्या सलग दोन वर्षांपासून रेती घाटाचे रखडलेले लिलाव यावर्षी करण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांनी कोट्यवधींच्या घरात बोली बोलून कंत्राट घेतले. प्रशासनामार्फत वाळूचे कंत्राट मिळताच लिखितवाडा व सोमनपल्ली या घाटावरील अधिकृत कंत्राट घेणाऱ्यांनी उत्खननाचा सपाटा लावण्यासाठी खनिकर्म विभागाची नियमावली पायदळी तुडवून चक्क पोकलेन मशीनच्या साहाय्याने सीमांकन क्षेत्राबाहेर व सीमांकन क्षेत्रात खोलवर उपसा करण्याचा सपाटा सुरू केला आहे.  या ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहतूक रस्त्याशेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकांवर तसेच जमिनीवर प्रचंड प्रमाणात धूळ साठवणूक होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या सर्व बाबींकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, ज्या घाटांचा लिलाव झाला आहे, त्या ठिकाणी महसूल विभागाने पर्यावरण किंवा शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी नियमही लादले आहे. मात्र हे नियम संबंधित घाटावर पाळले जात नाहीये.पोकलेन मशीनद्वारे वाळूचा उपसा करणे नियमबाह्य असतानाही गोंडपिपरी तालुक्यात चाललेल्या या सर्रास अवैध प्रकारावर खनिकर्म तसेच महसूल विभागाची विशेष मेहरबानी का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :sandवाळू