शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांनाच जादा सेंद्रीय खत पुरवठा, शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:46 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देपुरवठा करताना दुजाभाव : विरोधी सत्ताधाऱ्यांकडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन जादा खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, या प्रश्नावरून जि. प. च्या विरोधी पक्षातील सदस्यांनी गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सेंद्रीय खत पुरवठ्याचाही समावेश आहे. खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने सेंद्रीय खत पुरवठ्याचे नियोजन केले होते. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तालुकानिहाय पंचायत समितीस्तरावर सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सारख्या प्रमाणावर खताचा पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, यात दुजाभाव करण्यात आला. चंद्रपूर तालुक्याला सेंद्रीय खताच्या ६५२ बॅग, बल्लारपूर तालुका ५००. मूल तालुका ८०० बॅग, सावली ८०० बॅग, सिंदेवाही ५०० बॅग, नागभीड ५०० बॅग, ब्रह्मपुरी ५००, चिमूर ५००, वरोरा तालुका ८००, भद्रावती पाच हजार २२० बॅग, राजुरा एक हजार ५०० बॅग, गोंडपिपरी ५०० बॅग, पोंभूर्णा एक हजार बॅग आणि जिवती तालुक्याला ५०० बॅगचा सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात चिमूर, ब्रह्मपुरी, वरोरा, सिंदेवाही तालुक्यात शेती करणाºयांची मोठी आहे.याशिवाय तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्याही जास्त असल्याने सेंद्रीय खताचा पुरवठा करताना समान न्याय देणे गरजेचे होते. परंतु, भद्रावती तालुक्याला पाच हजार २२०, राजुरा एक हजार ५००, कोरपना १ हजार ५००, पोंभूर्णा एक हजार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय खताचा पुरवठा करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी सभेप्रसंगी केली.मागणीनुसार पुरवठ्याचे उत्तरजिल्ह्यातील भद्रावती, राजुरा, कोरपना आणि पोंभूर्णा तालुक्यातून मागणी जास्त आली. त्यामुळे मागणीनुसार सेंद्रीय खताचा पुरवठा करण्यात आल्याचे आता जिल्हा परिषदेकडून सांगण्यात येत आहे. सेंद्रीय खतासाठी अजूनही निधी मिळणार आहे. त्यानंतर अन्य तालुक्यांनाही वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद