शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

तूर खरेदीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:42 IST

शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेडद्वारा खरेदी करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही तुरीचा लाखो क्विंटल साठा उपलब्ध असल्याने नाफेडद्वारे तुरीची खरेदी करण्यास केंद्र शासनाकडे मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आर्थिक पिळवणूक थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेडद्वारा खरेदी करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही तुरीचा लाखो क्विंटल साठा उपलब्ध असल्याने नाफेडद्वारे तुरीची खरेदी करण्यास केंद्र शासनाकडे मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. केंद्राने या प्रस्तावाची दखल घेवून तूर खरेदीस मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे ना. अहीर यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारने तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. राज्य शासनाने राज्यात तूर उत्पादन वाढीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करण्याचे विशेष धोरण राबविल्याने यंदा तुरीचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. चंद्रपूर जिल्ह्यामध्येही तुरीचे बंपर उत्पादन झाले असून अजूनही लाखो क्विंटल तूर शेतकºयांच्या घरात विक्रीअभावी पडून आहे. त्यामुळे शेतकºयांना न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असून मुदतवाढीसाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. या एकंदरीत प्रयत्नातून आता केंद्र सरकारने तुरीची पुन्हा नाफेडद्वारे खरेदी करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नाफेडच्या माध्यमातून पुन्हा तुरीच्या खरेदीस प्रांरभ होणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी दिली आहे. या संदर्भात ना. हंसराज अहीर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये राज्याचे कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व नाफेडचे कार्यकारी संचालक संजीवकुमार चढ्ढा यांच्या दरम्यान तुर खरेदीविषयक मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली असून पुन्हा नव्याने तुर खरेदी सुरू होत असल्याची माहिती या बैठकीमध्ये नाफेडच्या कार्यकारी संचालकांनी दिली. तुर खरेदीस मुदतवाढ दिल्याने शेतकºयांकडे साठा असलेल्या तुरीची खरेदी होण्यास मोठा वाव मिळाला असून शेतकºयांना खासगी व्यापाºयांच्या माध्यमातून तुरीची खरेदी करण्याचा प्रश्नच उदभवनार नाही.नाफेडने खरेदी केलेली तूर पावसात भिजलीवरोरा : कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडच्या वतीने हमी भावाने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदी बंद होवून १० दिवसांचा कालावधी लोटूनही तूर गोदामामध्ये ठेवण्यात आली नाही. २६ मे रोजी झालेल्या पावसात अनेक तुरीचे पोते भिजल्याने नाफेडचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाफेडच्या वतीने खाजगी संस्थेमार्फत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हमी भावाने तूर खरेदीला प्रारंभ करण्यात आला. संथ गतीने तूर खरेदी करण्यात आली. १९९४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करुन १५ मेपर्यंत १९ हजार क्विंटल तूर खरेदी करुन बाजार समितीच्या यार्डमध्ये ठेवण्यात आली. तूर खरेदीची गर्दी व जागा लक्षात घेता व्यापाºयांनी आपली खरेदी बंद ठेवून सहकार्य केले. तूर खरेदी झाल्यानंतर ती तात्काळ गोदाममध्ये ठेवण्याकरिता बाजार समितीसह सर्वांनी तगदा लावला. दहा दिवस झाल्यानंतरही तूर गोदामात ठेवली जात नसल्याने अजूनही बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हजारो क्विंटल तूर पडून आहे. २६ मे रोजी आलेल्या वादळी पावसात अनेक तुरीचे पोते ओले झाले असून तूर भिजली आहे. याची दखल घेतली नाही, तर त्याला कोंबे फुडून ती तूर व्यर्थ जाणार आहे. याचा फटका नाफेडला बसणार असल्याचे मानले जात आहे.तूर उचलण्याची संथगती सर्वांना भोवली१५ मे रोजी नाफेडची तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यांनतर तातडीने तूर उचलून गोदामात नेण्याकरिता बाजार समिती वारंवार प्रयत्न करीत होते. काही दिवसांनी संथगतीने तूर उचण्यास सुरुवात करण्यात आली. नाफेडने तूर बाजार समिती यार्डमध्ये सर्वत्र पडून असल्याने व्यापाºयांनाही आपली खरेदी सुरु करता आली नाही. संथगतीने तूर उचलण्यात आल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे.वरोरा वगळता इतरत्र चणा विक्रीनाफेडकडे चणा विक्रीकरिता नोंदणी केली. परंतु जोपर्यंत तूर उचलत नाही, त्याकरिता जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत व्यापाºयांनाही चणा खरेदी करता येत नसल्याने मार्केट बंद झाले. शेतीचा हंगाम सुरु झाल्यानंतर वेळ मिळणार नाही म्हणून शेतकºयांना हिंगणघाट, वणी, चंद्रपूर येथे चणा विकावा लागला. त्याचा फटका वरोरा बाजार समितीला बसला आहे.