शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जिल्ह्यातील ११४ आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 6:00 AM

वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही, या प्रश्नांने कर्मचारी चिंताग्रस्त होते. चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातही हाच प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देरूग्णसेवेचा दर्जा सुधारणार : सीएसच्या अहवालावर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागात कार्यरत असणाºया ११४ अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा मागील महिन्यातच समाप्त झाली होती. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाºया या कर्मचाºयांना अस्थिरतेची टांगती तलवार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्येही नाराजी होती. दरम्यान, जिल्हाशल्य चिकित्सकांच्या अहवालावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सर्वच १२४ कर्मचाऱ्यांना २९ फेबु्रवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. भद्रावती व वरोरा तालुक्यात प्रामुख्याने शेतीवर आधारीत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांऐवजी शासकीय उपजिल्हा रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्याशिवाय पर्याय नाही. वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही, या प्रश्नांने कर्मचारी चिंताग्रस्त होते. चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातही हाच प्रकार सुरू आहे. या रूग्णालयात तब्बल ७० अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून प्रशासकीय अधिकारी, परिसेविका, अधिकपरिचारिका, भौतिक उपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष किरण, प्रयोगशाळा, इसीजी, भांडार तथा वस्त्रपाल, कक्षसेवक व सफाई कामगार आदी कर्मचाºयांचा समावेश आहे. या अस्थायी कर्मचाºयांचीही मुदत संपली होती. विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच अस्थाई कर्मचाºयांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा होती. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील अस्थायी कर्मचाºयांच्या सेवेबाबत राज्य आरोग्य सेवा संचालनाकडे वस्तुनिष्ठ व सकारात्मक अहवाल सादर केला होता.त्यामुळे हा अहवाल मान्य करून सर्व ११४ अस्थायी कर्मचाऱ्यांना २९ फेबु्रवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष वाघ्र संरक्षण पथकालाही दिलासाताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दलात दीडशेहून अधिक वनकर्मचारी अस्थायी पदावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची मुदत मागील महिन्यातच संपली. या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वन निरीक्षक आदींचा समावेश आहे. वनविभागाने या सर्व कर्मचाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.रिक्त पदे भरावीजिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात रिक्त पदे भरण्यात आली. त्यामुळे रूग्णांना चांगली सुविधा मिळत आहे. परंतु, ग्रामीण तसेच आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आस्थापन व परिचारिकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर कार्यवाही करावी.

टॅग्स :doctorडॉक्टर