शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

शासनाच्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:25 IST

शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर शासनाचा भर आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : सामाजिक दायित्व निधी अंतर्गत विकासाला सुरुवात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून विकासाबरोबरच या घटकांच्या सामाजिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करण्यावर शासनाचा भर आहे. या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विकासाचा प्रवाह अंतिम घटकांपर्यंत पोहचेल याची खबरदारी घेण्याचे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारीत प्रकल्पाअंतर्गत सामाजिक दायित्व निधीतून प्रस्तावित विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम मुधोली येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला वरोरा विधानसभा क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर, माजी मंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, पं.स. सदस्य नाजुका मंगाम, तहसिलदार शितोळे, महाऔष्णिक विद्युत केंद्राचे चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, मुधोलीच्या सरपंच चवरे, कोंडेगावचे सरपंच रवी घोडमारे उपस्थित होेते.आज विकासाभिमुख योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात विकासाला नवी दिशा मिळाली आहे. शुद्ध पेयजल, सिंचनाच्या सुविधा, रोजगाराच्या संधी, परिसर स्वच्छता, स्वास्थ सुविधा व सुदृढ असे जनजीवन जगने प्रत्येकाचे अधिकार असल्याचे ते म्हणाले.यावेळी आ. धानोरकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा परामर्श घेत या विकासामुळे खेडे गाव विविध क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. वीज केंद्राच्या सामाजिक दायित्व निधीतून मुधोली येथे रस्ता खडीकरण, घोडपेठ येथील निवासी शाळेकरिता सिमेंट कॉंक्रीट रस्ता, कोंडेगाव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण, वायगाव येथे सिमेंट नाला बंधारा व खोलीकरण अशी विविध कामे केली जात आहेत.