शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाचे शोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:26 IST

देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : चंद्रपूर येथे संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबवित असल्याचा आरोप भारिप - बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचित बहुजन आघाडी संवाद यात्रा शनिवारी चंद्रपुरात दाखल झाली. यावेळी राजीव गांधी कामगार सभागृहात संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.कार्यक्रमाला माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी, कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, महासचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, देशात काही निवडक उद्योजकांची मक्तेदारी सुरू आहे. या उद्योजकांच्या माध्यमातून देशातील जनतेला लुटण्याचे धोरण मोदी सरकार राबवित आहे. याद्वारेच भाजपा आणि आरएसएस देशात एकाधिकारशाहीचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर एकाधिकारशाही देशात अस्तित्वात आली तर बहुजनांना कोणत्याच संधी मिळणार नाही. त्यामुळे बहुजनांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरएसएस, भाजपाचे हे डाव उधळून लावू, यासाठी बहुजनांनी साथ द्यावी, असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.राज्यातील सत्ता काही कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाली असून, बहुजणांना सत्तेपासून रोखण्याचे काम सुरू आहे. देशात बहुजणांची संख्या सर्वाधिक असताना हा बहुजन समाज सत्तेपासून दूर आहे. ओबीसी, धनगर, आदिवासी, माळी आणि बौद्धांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजय मोरे, कृष्णाजी नागपुरे, एल. के. मडावी यांनी मार्गदर्शन करताना भाजप सरकारवर टिका करीत सर्वांनी संघटीत होण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचे आयोजन भारिप- बमसंचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे महासचिव धीरज बांबोळे, बंडू ठेंगरे, खुशाल मेश्राम, रूपचंद निमगडे, सुमित मेश्राम, राजू किर्तक, तनुजा रायपुरे, लता साव, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, पी. डब्लू. मेश्राम, कुसूर दुपारे यांनी केले होते. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील बहुजन जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.